• Download App
    अफाट विध्वंस घडविणाऱ्या लाटा|Waves wreaking havoc

    विज्ञानाची गुपिते : अफाट विध्वंस घडविणाऱ्या लाटा

    पाण्याखालील किंवा किनारी भागातील भुकंप, भूमीपात अथवा ज्वालामुखीचा उद्रेक यामुळे समुद्रपृष्ठाचे विस्थापन होऊन ज्या लाटा निर्माण होतात त्यांना जपानी भागात त्सुनामी म्हणतात. या लाटांची तरंग लांबी प्रचंड १०० ते २०० मीटर इतकी प्रचंड असते. तर आवर्तकाळ दीर्घ म्हणजे ३० मिनीटे व भर समुद्रातील वेग प्रचंड म्हणजे चार हजार मीटर खोलीवर सेकंदाला २०० मीटर वा ताशी ७२० किलो मीटर असू शकतो.Waves wreaking havoc

    भर समुद्रात यांची उंची ३० ते ६० सेंटी मीटर असून त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष ही जात नाही. मात्र खंडीय निघायाजवळ येताना त्यांचा वेग घटला, तरी उंची खूप वाढते. ती तब्बल १५ ते ३५ मीटर उंच असते. परिणामी त्या अतिशय विध्वंसक होतात आणि किनाऱ्यावर लाटेच्या शीर्षाचा आघात होऊन प्रचंड प्रमाणात जीवित व वित्त हानी होते. विशेषतः पॅसिफिक महासागरात निर्माण झालेल्या अशा लाटा तेथून हजारो किलो मीटर दूर असलेल्या किनाऱ्यांवर जाऊन आदळतात.

    म्हणून त्यांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा जगात सर्वप्रथम पॅसिफिकमध्ये उभारली आहे. अशा तऱ्हेने त्या केवळ महासागरच पार करीत नाहीत, तर कधीकधी संपूर्ण पृथ्वीलाही वळसा घालतात. समुद्रतळावरील भूकंपाने सेकंदाला १५०० मीटर आघात तरंग निर्माण होऊ शकतात व त्यांच्या आघाताने जहाज खडकावर आपटते की काय, असे वाटते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लाटांचे लष्करी, भूवैज्ञानिक आणि आभियांत्रिकीय महत्व लक्षात आले.

    त्यामुळे लाटांविषयीच्या पुर्वानुमानाचा अभ्यास करण्यात येऊ लागला. यातून लाटा, महातरंग, फेनिल तरंग, त्सुनामी यांच्या भाकितांची तंत्रे पुढे आली. मुख्यतः अनुभवांतून व उपकरणांद्वारे मिळालेली लाटांची माहिती यासाठी वापरतात. शिवाय वारे व लाटा यांच्यातील परस्पर – संबंधाविषयीची निश्चित सैध्दांतिक माहितीही लाटांच्या भाकितात उपयुक्त ठरते. यामध्ये मुख्यत्वे महासागरी हवामान – नकाशांची मदत घेतात.

    स्व्हर्डुप व मुंक यांनी केलेल्या संशोधनामुळे या नकाशांच्या आधारे लाटांची उंची आणि आवर्तकाळ यांविषयी आगाऊ अनुमान करता येते. याचा दुसऱ्या महायुद्धात उपयोग करून घेण्यात आला होता. निर्मितीच्या ठिकाणातून लाट महातरंगाच्या रूपात कशी बाहेर पडेल याचे अनुमान करण्याचे प्रयत्नही चालू आहेत.

    Waves wreaking havoc

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!