video of elephant bidding farewell to mahout : हत्तीने त्याला जिवापाड जपणाऱ्या माहुताला त्याच्या मृत्यूनंतर अश्रूपूर्ण निरोप दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. केरळच्या कोट्टायममधील हा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. कोट्टायम येथील पलाट ब्रह्मदाथन नावाच्या हत्तीने त्याच्या माहुताच्या ओमनाचेथनच्या मृत्यूनंतर अतिशय दु:खी होऊन शेवटचा निरोप दिला. ओमनाचेथन यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. Watch heartwarming video of elephant bidding farewell to mahout who died of cancer in Kerala goes viral
विशेष प्रतिनिधी
कोट्टायम : हत्तीने त्याला जिवापाड जपणाऱ्या माहुताला त्याच्या मृत्यूनंतर अश्रूपूर्ण निरोप दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. केरळच्या कोट्टायममधील हा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. कोट्टायम येथील पलाट ब्रह्मदाथन नावाच्या हत्तीने त्याच्या माहुताच्या ओमनाचेथनच्या मृत्यूनंतर अतिशय दु:खी होऊन शेवटचा निरोप दिला. ओमनाचेथन यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला.
60 वर्षांपासून करत होते हत्तीची सेवा
स्थानिक वृत्तानुसार, ओमनाचेथन आसपासच्या भागात त्यांच्या हत्तींवरील प्रेमासाठी ओळखले जात होते. ते हत्तीची मनापासून सेवा करायचे. गेल्या साठ वर्षांपासून ते पलाट ब्रह्मदाथन नावाच्या या हत्तीची सेवा करत होते. लाकटूर गावचे रहिवासी ओमनाचेथन यांचा 3 जून रोजी कर्करोगामुळे मृत्यू झाला. ते 74 वर्षांचे होते.
सोंडेने अभिवादन करत अखेरचा निरोप
केरळमधील मंदिरांच्या धार्मिक सोहळ्यांमध्ये हत्ती ब्रह्मदथान आणि ओमानचेथन हे गेल्या अनेक वर्षांपासून भाग घेत होते. या दोघांची नाळ घट्ट जुळलेली होती. माणसाप्रमाणेच ते एकमेकांच्या भावना समजून घ्यायचे. ओमनाचेतन यांच्या मृत्यूची माहिती समजताच माहुताचे पार्थिव असलेल्या ठिकाणी हत्तीला आणण्यात आले. हत्ती येताच तो माहुताच्या पार्थिवाकडे गेला आणि सोंडेने अभिवादन करून अखेरचा निरोप दिला. दु:खी झालेला हत्ती तेथून दूर जाण्यास तयार नव्हता, परंतु नंतर लोकांनी त्याला बाजूला नेले.
Watch heartwarming video of elephant bidding farewell to mahout who died of cancer in Kerala goes viral
महत्त्वाच्या बातम्या
- ट्विटरची आणखी एक मोठी आगळीक, सरसंघचालक मोहन भागवतांच्या अकाउंटवरून ब्लू टिक हटवले
- Twitter ने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वैयक्तिक हँडलवरून ब्लू टिक हटवली, थोड्याच वेळात रिस्टोर केली, संघाच्या अनेक नेत्यांचे हँडल अद्यापही अनव्हेरिफाइड
- World Environment Day ! पंतप्रधान मोदी यांचा ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ इथेनॉल- बायोगॅस वापरावर शेतकऱ्यांशी संवाद
- गोकुळधाम सोसायटीत आनंदी आनंद! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये नोंद
- Maharashtra Unlock ! अखेर ठरले…महाराष्ट्रात ७ जूनपासून अनलॉक ; ५ टप्प्यात लॉकडाऊन हटवणार ; मध्यरात्री नियमावली जाहीर