video of elephant bidding farewell to mahout : हत्तीने त्याला जिवापाड जपणाऱ्या माहुताला त्याच्या मृत्यूनंतर अश्रूपूर्ण निरोप दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. केरळच्या कोट्टायममधील हा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. कोट्टायम येथील पलाट ब्रह्मदाथन नावाच्या हत्तीने त्याच्या माहुताच्या ओमनाचेथनच्या मृत्यूनंतर अतिशय दु:खी होऊन शेवटचा निरोप दिला. ओमनाचेथन यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. स्थानिक वृत्तानुसार, ओमनाचेथन आसपासच्या भागात त्यांच्या हत्तींवरील प्रेमासाठी ओळखले जात होते. ते हत्तीची मनापासून सेवा करायचे. गेल्या साठ वर्षांपासून ते पलाट ब्रह्मदाथन नावाच्या या हत्तीची सेवा करत होते. लाकटूर गावचे रहिवासी ओमनाचेथन यांचा 3 जून रोजी कर्करोगामुळे मृत्यू झाला. ते 74 वर्षांचे होते. watch emotional video of elephant bidding farewell to mahout who died of cancer in kottayam Kerala
महत्त्वाच्या बातम्या
- कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या 5600 कोटींच्या मालमत्तेचा लिलाव करणार बँका, पीएमएलए कोर्टाने दिली मंजुरी
- चिंताजनक : जगात वुहानसारख्या 59 प्रयोगशाळा, विषाणू लीक होण्याच्या दुर्घटनांचा धोका वाढला
- ट्विटरचा यू-टर्न : सरसंघचालकांसह अनेक नेत्यांच्या खात्यावर ब्लू टिक पुन्हा बहाल, फॉलोअर्सही वाढले
- GST Collection : मे महिन्यात जीएसटी कलेक्शनमध्ये 65 टक्के वाढ, सरकारी तिजोरीत किती आले जाणून घ्या
- Edible Oil Price : महागड्या खाद्यतेलापासून लवकरच सर्वसामान्यांना दिलासा, आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरण