WATCH: 2019 – I Love You Vibhu… Jai Hind! Says goodbye to husband; 2021- ‘Veer’ wife Nitika pays homage to martyred husband in uniform!
विशेषप्रतिनिधी
नवी दिल्ली : पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर विभूती शंकर धौंडीयाल हे शहीद झाले होते. तेव्हा त्यांचं ९ महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांच्या ९ महिन्यांच्या संसारात त्यांची साथ देणाऱ्या नितिका कौल धौंडीयाल यांनी पतीच्या जाण्याचं दुःख विसरून सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला.त्या आज भारतीय सैन्यात सामील झाल्या आहेत. सैन्यात भरती झाल्यानंतर त्या आता ‘लेफ्टनंट नितिका धौंडियाल’ बनल्या आहे. नितिका यांनी आज भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करून हुतात्मा मेजर विभूती शंकर यांना श्रद्धांजली वाहिली.WATCH: 2019 – I Love You Vibhu… Jai Hind! Says goodbye to husband; 2021- ‘Veer’ wife Nitika pays homage to martyred husband in uniform!
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी नितिका कौल (Nitika Kaul) या भारतीय सैन्यात सामील झाल्या आहेत. सैन्यात भरती झाल्यानंतर त्या आता ‘लेफ्टनंट नितिका धौंडियाल’ बनल्या आहे. मेजर विभूती फेब्रुवारी 2019 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते.
मेजर विभूती शंकर धौंडियाल यांचे पार्थिव आपल्या गावी पोहोचले तेव्हा पत्नी नितिका यांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटला. मेजर धौंडियाल यांच्या मृतदेहाजवळ उभे राहून नितिका यांनी आपल्या पतीला सलाम केला. नितिका म्हणाल्या, ‘तू माझ्यापेक्षा आपल्या देशावर अधिक प्रेम करतोस आणि मला त्याचा अभिमान आहे.’
पतीच्या जाण्याचं दु:ख कुरवाळत न बसता सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेणाऱ्या नितिका धौंडीयाल यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.