विशेष प्रतिनिधी
मुंबई : शहरातील झोमॅटो कंपनी व्यवस्थापनाने अचानक डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांचे पार्सल डिलिव्हरी रेट कमी केल्याने व 15 किलोमीटर पेक्षा जास्त लांबची डिलिव्हरीवर नवीन कमी दराचे रेटकार्ड लागू केले. Zomato delivery workers suddenly Announced there will be no work
रात्री होणाऱ्या मारहाण व चोरीच्या घटनेत कंपनी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे 300 पेक्षा अधिक झोमॅटो डिलिव्हरी कामगारांनी कल्याणमधील मेट्रो मॉल जवळ काम बंद केले. कंपनी व्यवस्थापन जोपर्यंत आश्वासन देत नाही किंवा येऊन भेटत नाही तोपर्यंत काम बंद करणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला.
- झोमॅटो डिलिव्हरी कामगार अचानक गेले संपावर
- कल्याणमधील मेट्रो मॉलजवळ काम बंद आंदोलन
- कामगारांचे पार्सल डिलिव्हरी रेट कमी करून टाकले
- 15 किलोमीटर पेक्षा जास्त डिलिव्हरीवर नवे रेटकार्ड
- मारहाण व चोरीच्या घटनेत कामगारांकडे दुर्लक्ष
- कंपनी व्यवस्थापनाकडून आश्वासनाची अपेक्षा
Zomato delivery workers suddenly Announced there will be no work