• Download App
    गर्भश्रीमंत जेफ बेजोससोबत अंतराळाच्या सफरीवर जाणार 82 वर्षे वयाच्या वॅली फंक, सर्वात पहिल्या महिला उड्डाण प्रशिक्षक । wally funk 82 year old woman will travel to space with jeff bezos this month

    गर्भश्रीमंत जेफ बेजोससोबत अंतराळाच्या सफरीवर जाणार 82 वर्षे वयाच्या वॅली फंक, सर्वात पहिल्या महिला उड्डाण प्रशिक्षक

    wally funk : अ‍मेझॉनचे अब्जाधीश संस्थापक जेफ बेझोस या महिन्याच्या शेवटी त्यांची रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिनद्वारे अंतराळ प्रवास करणार आहेत. 1960 मध्ये नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या 13 महिलांपैकी एक असलेल्या वॅली फंकही त्यांच्यासोबत असतील. खरं तर ब्लू ओरिजिनने गुरुवारी ही घोषणा केली की, ’82 वर्षांच्या वॅली फंक अवकाशात प्रवास करणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात वृद्ध व्यक्ती असतील.’ wally funk 82 year old woman will travel to space with jeff bezos this month


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अ‍मेझॉनचे अब्जाधीश संस्थापक जेफ बेझोस या महिन्याच्या शेवटी त्यांची रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिनद्वारे अंतराळ प्रवास करणार आहेत. 1960 मध्ये नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या 13 महिलांपैकी एक असलेल्या वॅली फंकही त्यांच्यासोबत असतील. खरं तर ब्लू ओरिजिनने गुरुवारी ही घोषणा केली की, ’82 वर्षांच्या वॅली फंक अवकाशात प्रवास करणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात वृद्ध व्यक्ती असतील.’

    त्याच बरोबर, कंपनीच्या संकेतस्थळावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये व्हॅली फंकने म्हटले आहे की, ‘मी कधी अंतराळात जाईन असे मला वाटत नव्हते.’ मिळालेल्या माहितीनुसार वयाच्या 21व्या वर्षी वॅलीने पायलट म्हणून नासा प्रोग्राममध्ये मर्क्युरी सेव्हन पुरुष अंतराळवीरांसारखीच कठोर परीक्षा दिली होती, परंतु 13 महिलांच्या गटात त्या सर्वात तरुण होत्या. यामुळे त्यांना अंतराळात जाण्यापासून रोखले गेले. दरम्यान, अंतराळ प्रवासापूर्वी जेफ बेझोस आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    पहिल्या महिला उड्डाण प्रशिक्षक

    वॅली फंक या अमेरिकन सैन्याच्या तळावर असलेल्या पहिल्या महिला उड्डाण प्रशिक्षक आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाची हवाई सुरक्षा तपासणीस बनणाऱ्याही पहिल्या महिला होत्या.

    5 जुलैला बेझोस यांचा राजीनामा

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस 5 जुलै रोजी अ‍मेझॉन डॉट कॉम इंकच्या सीईओ पदाचा राजीनामा देतील. सहकारी अब्जाधीश एलन मस्क आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासमवेत विकसित केलेल्या रॉकेटद्वारे अवकाशात प्रवास करणारे पहिले व्यक्ती ठरणार आहेत.

    wally funk 82 year old woman will travel to space with jeff bezos this month

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!