लंगरमध्ये सेवा देऊन आंदोलक शेतकऱ्यांचा एन्जॉय
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली सीमेवर पंजाब हरियाणाचे शेतकरी दोन आठवड्यापासून तीन कृषी कायद्याला विरोध करत आंदोलन करत आहेत. परंतु राहण्यासाठी वाटरप्रूफ तंबू आणि विरंगुळ्यासाठी व्हॉलिबॉलचा खेळ तेथे सुरु आहे. त्यामुळे हे आंदोलन पंजाबमधील श्रीमंत शेतकऱ्यांचे असल्याचे स्पष्ट होते.
Farmers agitation or farmers enjoyment?
शेतकरी आंदोलना संदर्भातील एक ट्विट छायाचित्रासह प्रसिद्ध झाले आहे. हे छायाचित्र दिल्ली हरियाणा सीमेवरील सिंहू येथील आहे. त्यात शेतकरी चक्क व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंद लुटत आहेत. पण, लंगरमध्ये सेवा दिल्यावर आम्ही व्हॉलिबॉल खेळतोय, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे शेतकरी स्वतःहून आंदोलनाचे गांभीर्य आणि महत्त्व संपुष्टात आणत आहेत.
Farmers agitation or farmers enjoyment?
लंगारमध्ये सेवा दिल्यानंतर आम्ही येथे व्हॉलीबॉल खेळतो. – रणजित सिंग, शेतकरी, जालंधर