सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रीडाप्रेमींनी त्याच्या डान्स स्टेपचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.Virat Kohli’s abandoned dance to the song ‘My Name Is Lakhan’; Video viral
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत – अफगाणिस्तान सामना झाला.या सामन्यादरम्यानचा विराट कोहलीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकदा मैदानावर डान्स करताना भारतीय कर्णधार विराट कोहली दिसला आहे.
अफगाणिस्तान भारत सामन्यादरम्यान अनिल कपूरच्या ‘माय नेम इज लखन’वर विराट कोहली डान्स करताना दिसला. सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रीडाप्रेमींनी त्याच्या डान्स स्टेपचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
- विराट कोहलीच्या समर्थनार्थ आले राहुल गांधी, ट्वीट करून म्हणाले- या द्वेषाने भरलेल्या लोकांना माफ कर!
अफगाणिस्तानच्या फलंदाजीवेळी विराट कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी जात होता. तेव्हा ‘माय नेम इज लखन’ हे गाणे लागले होते. विराट कोहली हे गाणे ऐकताच स्वत:ला आवरू शकला नाही आणि तो तिथेच नाचू लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विराट कोहली यापूर्वी २०१६ टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान डान्स करताना दिसला होता. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हाच अंदाज दिसला होता.
Virat Kohli’s abandoned dance to the song ‘My Name Is Lakhan’; Video viral
महत्त्वाच्या बातम्या
- आशीष शेलार कृष्ण कुंजवर जाऊन घेणार राज ठाकरेंची भेट ; BMC साठी अखणार नवी समीकरणे
- केदारनाथ धाम पंतप्रधान मोदींसाठी का आहे खास?, चार वर्षांत पाचव्यांदा भेट, 2019 मध्ये येथे 17 तास केली साधना…
- औरंगाबाद : ऐन रब्बीच्या तोंडावरच केवळ ८ तास वीजपुरवठा
- Aryan Khan Drugs Case: साप्ताहिक हजेरीसाठी आर्यन खान NCB कार्यालयात पोहोचला, मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता सशर्त जामीन