Virat Kohli resigns From Test captaincy : विराट कोहलीने वनडे आणि टी-20 नंतर आता भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने ट्विट करून चाहत्यांना ही माहिती दिली. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी 68 कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान भारताने 40 सामने जिंकले असून 17 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाला अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. Virat Kohli resigns From Test captaincy, emotional letter shared on social media
प्रतिनिधी
मुंबई : विराट कोहलीने वनडे आणि टी-20 नंतर आता भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने ट्विट करून चाहत्यांना ही माहिती दिली. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी 68 कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान भारताने 40 सामने जिंकले असून 17 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाला अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता.
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून कर्णधारपद सोडल्याची माहिती दिली. त्याने ट्विटरवर एक लांबलचक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्याने बीसीसीआय आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. यासोबतच विराटने त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दलही सांगितले आहे.
विराटने पत्रात लिहिले की, ‘गेल्या 7 वर्षांत मी कठोर परिश्रम घेऊन संघाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. मी माझी जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली आहे.
बीसीसीआयचे आभार मानताना कोहलीने लिहिले, मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो, त्यांनी मला इतके दिवस भारतीय संघाचा कर्णधार राहण्याची संधी दिली.
विराटने टीम इंडियासाठी आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 7962 धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटी फॉर्मेटमध्ये 27 शतके आणि 28 अर्धशतके केली आहेत. त्याची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 254 आहे. कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाले तर कोहलीने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. यादरम्यान भारताची सामना जिंकण्याची टक्केवारी 58.82 इतकी आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 40 सामने जिंकले आहेत.
Virat Kohli resigns From Test captaincy, emotional letter shared on social media
महत्त्वाच्या बातम्या
- दलिताच्या घरी जेवणाऱ्या भाजप खासदार रवी किशन यांना नवाब मलिकांचा टोमणा, म्हणाले- वाह बचवा वाह.. ज़िंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा!
- कोल्हापूर उत्तर शिवसेनेच्या मालकीची, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा इशारा
- यूपीत भाजपला हरवणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही, राष्ट्रवादी नाव असल्याने राष्ट्रीय पक्ष होत नाही – रामदास आठवले
- लष्कर दिनानिमित्त लष्करप्रमुख एमएम नरवणे यांचा चीनला पुन्हा इशारा, म्हणाले- आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका!
- Assembly Election 2022 : मोठ्या सभांवर 22 जानेवारीपर्यंत बंदी, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय