- टोकियो ऑलिम्पिकमधील गैरवर्तनाचा ठपका ठेवत विनेश फोगाटवर निलंबनाची कारवाई
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकमध्ये बेशिस्त वागणुकीचा ठपका ठेवण्यात आलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्ती महासंघाची माफी मागितली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये विनेशचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर कुस्ती महासंघ तिच्या कामगिरीवर नाराज असल्याचं समोर आलं होतं. विनेशने माफी मागितली असली तरीही कुस्ती महासंघ तिला इतक्यात जागतिक पातळीवर खेळण्याची परवानगी देईल अशी चिन्ह दिसत नाहीत.Vinesh Phogat! Vinesh apologizes to Wrestling Federation; Less likely to be allowed to participate in the competition
उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात आलेल्या विनेश फोगाटवर, बेशिस्त वागणूक, भारतीय संघाची अधिकृत जर्सी न घालणे, खेळाडूंसोबत न राहता वेगळा सराव करणे असे आरोप ठेवण्यात आले होते. कुस्ती महासंघाने निलंबनाची कारवाई केल्यानंतर विनेशने स्पर्धेदरम्यान आपल्याला झालेल्या मानसिक आणि शाररिक त्रासाबद्दल माहिती दिली होती. विशेनला आपल्या खासगी फिजीओला घेऊन टोकियोला जाण्याची परवानगी मिळालेली नव्हती ज्यावरुनही मोठा वादंग निर्माण झाला होता.
कुस्ती महासंघानेही विनेश फोगाटचा माफीनामा आपल्यापर्यंत पोहचल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
परंतू या माफीमान्यानंतरही विनेश फोगाटला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जाण्याची संधी मिळेल याची शाश्वती कमी आहे. OGQ आणि JSW सारख्या खासगी संस्था खेळाडूंना करत असलेल्या मदतीवरुन कुस्ती महासंघ नाराज आहे. खासगी संस्था कुस्तीपटूंना बिघडवत असल्याचं कुस्ती महासंघाचं म्हणणं आहे. त्यामुळे भविष्यात अशा संस्थांना प्रमुख खेळाडूंच्या सरावात लक्ष घालू न देण्याचा विचार महासंघाने केला आहे.