• Download App
    पुरस्कारवापसीचा धमकी देणाऱ्या विजेंदर सिंगला 'ठोसा', व्हीआयपी प्लॉट आणि बॉक्सींग अ‍ॅकॅडमी कधी परत करणार? | The Focus India

    पुरस्कारवापसीचा धमकी देणाऱ्या विजेंदर सिंगला ‘ठोसा’, व्हीआयपी प्लॉट आणि बॉक्सींग अ‍ॅकॅडमी कधी परत करणार?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने अनेक जण आपले राजकीय द्वेष दाखवू लागले आहेत. काही जण तर पुरस्कारवापसीची धमकी देऊ लागले आहे. बॉक्सर विजयेंद्र सिंगनेही राष्ट्रीय सन्मान असलेला खेलरत्न पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले आहे. यावर नेटकऱ्यांनी विजेंद्रसिंगला चांगलेच ‘ठोसे’ हाणले आहेत.  Vijender Singh threatens to return award

    शेतकऱ्यांसाठीची भूमिका प्रामाणिक असेल तर पदक जरुर परत कर, पण त्यासोबतच सरकारने दिलेला व्हीआयपी प्लॉट आणि बॉक्सींग अ‍ॅकॅडमीसुद्धा कधी परत करणार, असा जबरदस्त ठोसा मारणारा प्रश्न नेटकऱ्यांनी विजेंदर सिंगला केला आहे.

    सरकारला विरोध दर्शवण्यासाठी सरकारी पुरस्कार परत करण्याची टूम गेल्या काही वर्षात निघाली आहे. तथाकथित सेलिब्रिटी भूमिका घेत असल्याचे दाखवून मोठ्या घोषणा करतात. प्रत्यक्षात पुढे त्याचे काय झाले, हे कोणालाच समजत नाही. शिवाय पुरस्कार परत करतात म्हणजे काय करतात हेही जनतेला समजलेले नाही. पुरस्कारासाठी मिळालेली रक्कम परत दिली जाते का, सन्मानचिन्हे परत दिली जातात का, याची उत्तरे जनतेला मिळत नाहीत. परंतु, अशा विधानांची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात होते.

    विजेंद्रर सिंग या बॉक्सींगपटूसह अनेकांनी याच पद्धतीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपले पुरस्कार परत करण्याची धमकी दिली आहे. नावापुरता पुरस्कार परत करायचा पण त्याचे फायदे मात्र कायम ठेवायचे, या सेलिब्रिटींच्या सोईस्कर वृत्तीवर टीका होत आहे.

    Vijender Singh threatens to return award

    सोशल मिडियात लोकप्रिय असलेल्या शेफाली वैद्य म्हणाल्या की, विजयेंद्र पुरस्कार जरूर परत कर. पण त्याचबरोबर सरकारकडून मिळालेले इतर सन्मानही परत दे. दिल्लीमध्ये मिळालेला व्हीआयपी प्लॉट, बॉक्सींग अ‍ॅकॅडमी कधी परत करणार हे देखील सांग. विजयेंद्र सिंग याने २०१९ मध्ये दिल्लीतून कॉंग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्याचा दारुण पराभव झाला होता.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…