• Download App
    वडेट्टीवार म्हणतात, मंत्रिपद गेले तरी चालेल ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही | The Focus India

    वडेट्टीवार म्हणतात, मंत्रिपद गेले तरी चालेल ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही

    विशेष प्रतिनिधी

    जालना : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा घोळ महाविकास आघाडी सरकार घालत असताना काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नसल्याचं मोठे वक्तव्य केले आहे. obc reservation

    विजय वडेट्टीवार जालना दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाला धक्का लागेल, अशी भीती काही ओबीसी नेत्यांना वाटत आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाबरोबर आहोत. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचे आहे. obc reservation

    जर असा प्रयत्न झालाच तर मंत्रिपद गेले तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे विजय वडट्टीवार यांनी म्हटले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी समाजाचे पहिले मराठवाडास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती.

    ओबीसी मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, की ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू. विजय वड्डेटीवार जिवंत आहे तोवर धक्का लावायचा विषय नाही. वाटेल ते काय काढायचे असेल तर काढू. आपल्याकडे घोंगड आहे आणि काठी पण आहे. कोणाला कितीही देऊ द्या पण आमच्या हक्काचे नको. आमच्या वाट्याचं आरक्षण देऊ नका. आमच्या वाट्याला धक्का लावू नका, ही आमची विनंती आहे.

    देवेंद्र फडणवीस काय सुप्रीम कोर्ट आहे काय?

    देवेंद्र फडणवीस काय सुप्रीम कोर्ट आहेत काय? असे म्हणत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. भाजपच्या हातात सत्ता द्या मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं काही भाजप नेते वक्तव्य करत आहेत. मात्र फडणवीस काय सुप्रीम कोर्ट आहे काय? अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

    obc reservation

    आरक्षणाचा विषय आता राज्य सरकारच्या हातात नाही. हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर कोण सुप्रीम कोर्टात गेल. त्यावेळी कोणा शुक्राचार्याने बाजू मांडली माहिती नाही. मात्र हे मराठा समाजाचं दुर्देव असून फडणवीस काय सुप्रीम कोर्ट नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…