विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) मोठे यश मिळविले असून भारतातून बॅँकांची कर्जे बुडवून पळालेल्या विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. vijay mallya latest
इडीने सांगितल्यानंतर फ्रेंच अधिकाºयांनी ही मालमत्ता जप्त केलीआहे. युरो १.६ मिलियन युरो म्हणजे सुमारे १४ कोटींची ही मालमत्ता आहे. फ्रान्समधल्या तपास यंत्रणांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. आम्ही फ्रान्समधल्या तपास यंत्रणांना विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्यासंबंधीची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई केली आहे असे ईडीने म्हटलं आहे. vijay mallya latest
स्टेट बँकेसह इतर बँकांची नऊ हजार कोटींचा फसवणूक करून पळालेल्या विजय मल्ल्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी २०१९ मध्ये विजय मल्ल्याला मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट अंतर्गत कोटार्ने फरार आरोपी घोषित केले होते. मार्च २०१९ पासून तो लंडनमध्ये राहतो आहे. भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करते आहे.
ब्रिटनमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातला खटला सुरु आहे. याआधी न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयाला विजय मल्ल्याच्या वकिलांनी आव्हान दिलं. तसंच विजय मल्ल्याने ब्रिटन सरकारला शरणार्थी म्हणून आश्रय देण्याचीही विनंती केली आहे.
vijay mallya latest
भारत सरकारने याप्रकरणी विशेष बाब म्हणून प्रत्यार्पण मंजूर करावं अशी विनंती केली आहे. किंगफिशर एअरलाइन्सला बँकांच्या समूहाकडून सुमारे ७ हजार कोटींचं कर्ज देणअयात आलं होतं. व्याज आणि दंड यांची रक्कम मिळून कजार्चा हा डोंगर १२ हजार कोटींपर्यंत वाढला आहे. दरम्यान विजय मल्ल्याने सगळं कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर कर्ज बुडवल्याचाही आरोप फेटाळून लावला होता.