• Download App
    VIDEO WAR : व्हिडीओ का जवाब व्हिडीओसे ...! शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर ; पब्लिक म्हणाली ही तर सोनियासेना ! VIDEO WAR: The answer to video is video ...! BJP responds to Shiv Sena's video with Balasaheb's video; The public said this is Sonia Sena!

    VIDEO WAR : व्हिडीओ का जवाब व्हिडीओसे …! शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर ; पब्लिक म्हणाली ही तर सोनियासेना !

    काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत आहेत .VIDEO WAR: The answer to video is video …! BJP responds to Shiv Sena’s video with Balasaheb’s video; The public said this is Sonia Sena!


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शिवसेनेने राममंदिरा बाबत विरोधी भूमिका घेतली त्यावरून भाजप-सेना मध्ये तुफान राडा झाला . दरम्यान, शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर करत भाजपाला इशारा दिला त्याला प्रत्युतर देण्यासाठी भाजपानेही बाळासाहेबांचाच एक व्हिडीओ शेअर करून शिवसेनेला चांगलेच सुनावले आहे .यानंतर नेटकर्यांनी देखील आता ही सेना बाळासाहेबांची राहिली नाही ही सोनियासेना झाली आहे आसे म्हणतं शिवसेनेला फटकारले आहे .VIDEO WAR: The answer to video is video …! BJP responds to Shiv Sena’s video with Balasaheb’s video; The public said this is Sonia Sena!

     

    भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. भाजयुमोच्या फटकार मोर्चानंतर काही जणांनी शिवसेनाप्रमुखांचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यांच्यासाठी सोनिया मातोश्रींचा आणि त्यांच्यासमोर वाकणाऱ्यांचा विशेष उल्लेख असलेला हा खास व्हिडीओ, असा खोचक टोला लगावत अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

    दरम्यान, राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला होता. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येत आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती.

    VIDEO WAR: The answer to video is video …! BJP responds to Shiv Sena’s video with Balasaheb’s video; The public said this is Sonia Sena!

    Related posts

    रवींद्र चव्हाणांची खेळी पडली तोकडी; अंबरनाथ मध्ये शिंदे सेनेनेच मारली बहुमताची बाजी!!

    BMC Election 2026 : ‘स्पीडब्रेकर’ आघाडी पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाला कायमचे ‘ग्रहण’ लावणार!

    बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही, मग घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या व्यथा समजतील का??