- भारतीय नौदलाने विविध देशांकडून होणारा फेरी लिक्विड ऑक्सिजन कंटेनर, कॉन्सनट्रेटर्स आणि वैद्यकीय पुरवठ्यासाठी नऊ युद्धनौका तैनात केल्या आहेत.
- यातील तीन जहाज कुवेतहून ऑक्सिजन घेऊन निघाल्या आहेत.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली: देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. एका दिवसात तब्बल ४ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यात ऑक्सिजन तुटवडा जानवत आहे .भारतातील ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढण्यासाठी आता कुवेत देश मदतीला धावून आला आहे. कुवेतनं २१५ टन द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजन पाठवला आहे. आज चार जहाजं कुवेतहून भारतासाठी रवाना झाली . येत्या शनिवारपर्यंत भारतात हा ऑक्सिजन दाखल होणार असल्याचे कुवेतचे राजदूत जासेम इब्राहिम अल नजीम यांनी सांगितले. Vasudhaiva Kutumbakam! After India’s ‘Vaccine Friendship’, ‘Oxygen Friendship’ from all over the world; Kuwait sent 215 tons of oxygen; 3 warships sent to India
भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौका आणि एक मोठे व्यावसायिक जहाज एकूण २१५ टन वैद्यकीय द्रव ऑक्सिजन आणत आहेत. ते शनिवारी मुंबई व गुजरात येथील बंदरात दाखल होतील असे कुवैतचे राजदूत जासेम इब्राहिम अल नजीम म्हणाले .
विशेष म्हणजे, भारतासाठी येत्या तीन आठवड्यांमध्ये एकूण १,४०० टन ऑक्सिजन पाठवण्याची तयारी कुवेतनं दाखवली आहे. कुवेतच्या मदतीमुळे भारतातील ऑक्सिजन तुटवडा भरुन निघण्यास फार मोठी मदत होणार आहे.
“केवळ २१५ टन नव्हे, तर युद्धनौका पुन्हा कुवेतला रवाना होऊन येत्या काळात आणखी ऑक्सिजन आणण्याची नौदलाची तयारी आहे. तसेच कुवेतनंही १४०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे”,असंही इब्राहिम अल नजीम यांनी सांगितलं.
अल नजीम यांनी स्पष्ट केले की कुवेतमध्ये या प्रदेशात वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादित करणारी सर्वात मोठी कंपनी आहे आणि येथील दररोजचे उत्पादन सुमारे २०० टन आहे.आम्ही इराक, जॉर्डन आणि सौदी अरेबियासारख्या देशांना द्रव ऑक्सिजन पुरवतो. जेव्हा आम्ही भारतासारख्या मैत्रीपूर्ण देशात ऑक्सिजनची आवश्यकता पाहिली, तेव्हा आम्ही भारताला पाठिंबा देण्याचे ठरविले.
दरम्यान भारताकडून ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न केले जात आहेत. यात ऑक्सिजनची आयात आणि देशात ऑक्सिजन प्लांटची उभारणी यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे.