- बाकीच्या मंत्र्यांचीही पाणीपट्टी थकली
वृत्तसंस्था
मुंबई : मुख्यमंत्री राहाताहेत मातोश्रीवर; पाणीपट्टी थकली वर्षा बंगल्याची. अशी परिस्थिती खरेच उदभवली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकली असल्याची माहिती समोर आली आहे. पाणीपट्टीची ही रक्कम २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी आहे. varsha devgiri benglows owners water tax defaulters
अर्थात मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरच राहणे पसंत केले आहे. काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कुटुबीयांसह तीन दिवस वर्षा बंगल्यावर मुक्कामाला राहिल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण तेवढ्यात कालावधीत एवढे पाणी वापरले असेल? कारण ही थरबाकी २०२० या वर्षाची आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत टाकला आहे. आता दोन – तीन महिन्यांची सर्वसामान्यांची थकबाकी असल्यावर पाणी तोडणारी महापालिका वर्षा आणि मंत्र्यांच्या इतर बंगल्यांचा पाणी तोडणार का, हा प्रश्न विचारला जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली होती. यातूनच मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
varsha devgiri benglows owners water tax defaulters
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (सागर) यांचाही समावेश आहे