• Download App
    भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे परमोच्च स्फूर्तिगीत ऐका, "संत तुकाराम" विष्णुपंत पागनीस यांच्या आवाजात...!! Vande Matram in the exclusive voice of "Sant Tukaram" Vishnupant Pagnis

    भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे परमोच्च स्फूर्तिगीत ऐका, “संत तुकाराम” विष्णुपंत पागनीस यांच्या आवाजात…!!

    विनायक ढेरे

    नाशिक : एखाद्या वेगळ्या गोष्टीचा शोध घ्यायला जावे आणि निराळेच काहीसे हाती लागावे असे काहीसे झाले आहे…!! भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यलढ्याच्या देदीप्यमान इतिहासाची पाने चाळताना एक अतिशय स्फूर्तीदायक राष्ट्रगीत हाती आले आहे. अवघ्या मराठी जनांसाठी खजिना सापडावा असे झाले आहे. Vande Matram in the exclusive voice of “Sant Tukaram” Vishnupant Pagnis

    1936 मध्ये संत तुकाराम सिनेमा गाजविलेल्या ऋषीतुल्य विष्णुपंत पागनीस यांच्या आवाजातली वंदे मातरमची ध्वनि तबकडी आढळली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात HMV या कंपनीने तयार केलेली ही ध्वनि तबडकी अत्यंत गाजली होती. राग सारंग, त्यात विष्णूपंतांचा बहारदार आवाज त्यामुळे हे वंदे मातरम ऐकताना कानाला अतिशय गोड लागते. शिवाय शालेय जीवनात ऐकलेल्या वंदेमातरमपेक्षा एक वेगळी चाल ऐक ऐकताना काही वेगळाच आनंद मिळतो…!!

    वंदे मातरम तसे अनेक दिग्गज संगीतकारांनी आणि गायकांनी गायलेले स्फूर्तिगान आहे. विष्णुपंत पागनीस यांच्या आवाजातले हे गीत तर अतिशय दुर्मिळ आहे.

    वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय गीत हा दर्जा आहे. हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ या कादंबरीमध्ये समाविष्ट केले आहे. 1882 मध्ये ही कादंबरी त्यांनी प्रकाशित केली. परंतु त्याआधी 5 वर्षे त्यांनी हे गीत लिहिले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ते स्फूर्तिगीत बनले. या गीताला रवींद्रनाथ टागोर यांनी संगीत दिले आहे.

    ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताची एकच धून असून, त्याप्रमाणेच या राष्ट्रगीताचे गायन होत असते. परंतु वंदेमातरमच्या अनेक धून प्रचलित आहेत. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्या काळातील बंगाली नाट्य क्षेत्रातील लोकप्रिय संगीतकार जदुनाथ भट्टाचार्य यांच्याकडून वंदे मातरम्‌ची पहिली चाल बसवून घेतली होती. ही चाल अनेक वर्षे प्रचलित होती. २० व्या शतकामध्ये या गीताच्या ज्या चाली प्रचलित झाल्या, त्यापैकी अनेक चाली भारतीय संगीताच्या रागावर आधारित होत्या. ‘आनंद मठ’, ‘लीडर’ आणि ‘अमर आशा’ या चित्रपटांच्या चाली लोकप्रिय झाल्या. आनंदमठ या चित्रपटात वंदे मातरम् हे गीत लता मंगेशकर यांनी गायिले आहे. दुस-या एका प्रसंगात हेमंतकुमार यांनी ते गायिले आहे.

    पं. रविशंकर यांनी आकाशवाणीकरिता या गीताची जी चाल लावून दिली, ती खूप लोकप्रिय झाली होती. १९९७ मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी संगीतकार ए. आर्. रहमान यांनी ‘वंदे मातरम्’ हे शीर्षक असलेला गीत संग्रह प्रकाशित केला. २०१८ मधे सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका कल्याणी बोंद्रे यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताला नवीन चालीत बांधून हे गीत रसिकांसमोर आणले. रविशंकर व आणि रहमान यांनी बनवलेल्या चाली देस रागावर आधारित आहेत.
    ..

    गीतकार: बंकिमचंद्र चॅटर्जी

    रचना वर्ष : १८७६

    प्रकाशन वर्ष : १८८२

    वन्दे मातरम्
    वन्दे मातरम्
    सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
    सस्यश्यामलाम् मातरम्।

    शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
    फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
    सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
    सुखदाम् वरदाम् मातरम्‌ ॥ १ ॥
    वन्दे मातरम्‌ ।

    कोटि – कोटि – कण्ठ कल – कल – निनाद – कराले,
    कोटि – कोटि – भुजैर्धृत – खरकरवाले,
    अबला केन मा एत बले।
    बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
    रिपुदलवारिणीम् मातरम्‌ ॥ २ ॥
    वन्दे मातरम्‌ ।

    तुमि विद्या, तुमि धर्म
    तुमि हृदि, तुमि मर्म
    त्वं हि प्राणाः शरीरे
    बाहुते तुमि मा शक्ति,
    हृदये तुमि मा भक्ति,
    तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ ३ ॥
    मातरम् वन्दे मातरम्‌ ।

    त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
    कमला कमलदलविहारिणी
    वाणी विद्यादायिनी,
    नमामि त्वाम् नमामि कमलाम्
    अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम्‌ ॥ ४ ॥
    वन्दे मातरम्‌ ।

    श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
    धरणीम् भरणीम् मातरम्‌ ॥ ५ ॥

    वन्दे मातरम्‌ ।

    Vande Matram in the exclusive voice of “Sant Tukaram” Vishnupant Pagnis

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…