अमृता फडणविस नेहमीच आपल्या ट्विटमूळे चर्चेत असतात .आज प्रेम दिवसाच्या निमित्ताने त्यांनी परत एकदा पोस्ट केली आहे .
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो आहे. भारतातही या दिवसाचं सेलिब्रेशन होतं आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला समर्पित करण्याचा हा दिवस. गायिका अमृता फडणवीस यांनी आजच्या दिवशी एक खास फोटो ट्विट करत आपल्या संगीत आणि गायनावरील प्रेमाचा उल्लेख केला आहे.VALENTINES DAY SPECIAL
काय आहे अमृता फडणवीस यांचा ट्विट?
अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या ट्विटमधून स्वतःचा पार्वतीच्या रूपातला फोटो शेअर केला आहे. तसंच नवं गाणं हे भगवान शंकरासाठी आणलं जातं आहे असंही स्पष्ट केलं आहे. लॉर्ड शिवा म्हणजेच महादेवाच्या भक्तीवर आधारीत हे गाणं आहे. यातला अमृता फडणवीस यांचा लुक लक्ष वेधून घेतो आहे. भगव्या वस्त्रांमध्ये गळ्यात रुद्राक्षांची माळ घालून आणि हातात त्रिशुळधारी फोटो घेतलेल्या अमृता फडणवीस दिसत आहेत.
मी तुला निवडते आहे आता आणि कायमचे. माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात, श्वासात तू आहेस. हा व्हॅलेंटाईन डे जो आपल्या प्रिय व्यक्तीची प्रशंसा करतो.. मी माझ्या रूद्र, लॉर्ड शिवाला म्हणजेज भगवान शंकराला माझी संगीतमय स्तुती अर्पण करत आहे असं अमृता फडणवीस यांनी मह्टलं आहे. त्यामुळे आता त्यांचं नवं गाणं येणार आहे आणि त्यातून त्यांचा नवा लुकही पाहाण्यास मिळणार आहे यात काही शंका नाही. सध्या या अमृता फडणवीस यांच्या या लुकची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
अमृता फडणवीस या कायमच आपल्या वेगवेगळ्या ट्विट्स मुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मुंबईत ट्रॅफिकमुळे घटस्फोट होतात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची चर्चाही झाली होती आणि त्याबद्दल त्यांच्यवर टीकाही झाली होती. तसंच एक गायिका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहे. गणपतीची गाणीही त्यांनी गायली आहेत. तसंच अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका अल्बममध्येही त्यांनी काम केलं आहे.
आता व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीचं त्यांचं ट्विट आणि त्यावर लिहिलेल्या ओळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तसंच अमृता फडणवीस यांचा वेगळा लुकही चर्चेचा विषय ठरला आहे.
VALENTINE’S DAY SPECIAL