• Download App
    UTTAR PRADESH : जय केशव तय केशव ! उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना सिराथू मतदारसंघात शिवसेनेचा पाठिंबा ... UTTAR PRADESH: Jai Keshav Tay Keshav! Shiv Sena's support to Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya in Sirathu constituency ...

    UTTAR PRADESH : जय केशव तय केशव ! उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना सिराथू मतदारसंघात शिवसेनेचा पाठिंबा…

    सिरथूमध्ये यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य विरुध्द समाजवादी पार्टी असा सामना रंगणार आहे .या मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या भगिनी सपा कडून निवडणुक लढवत आहेत .


    या जागेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. गेल्या वेळी कौशांबी जिल्ह्यातील तीनही जागा भाजपने काबीज केल्या होत्या.


    विशेष प्रतिनिधी

    सिरथू: एकीकडे संजय राऊत म्हणतात उत्तर प्रदेश मध्ये भाजप हरणार आहे तर दुसरीकडे आज शिवसेनेच्या उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिला आहे .उत्तर प्रदेश मधील सिरथू विधानसभा जागा ही यूपी निवडणुकीत (UP चुनाव 2022) सर्वाधिक चर्चेत असलेली जागा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य येथून निवडणूक रिंगणात आहेत. समाजवादी पार्टी (एसपी) आघाडीने येथून केंद्रिय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या भगिनी पल्लवी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. या सामन्यात दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे.मात्र आता सिरथू विधानसभा 251 चे शिवसेना उमेदवार राजेश कुमार यादव यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना आपला पाठिंबा दिला आहे. त्यामूळे आता या निवडणुकीत भाजपचे पारडे आणखी जड झाले आहे .UTTAR PRADESH: Jai Keshav Tay Keshav! Shiv Sena’s support to Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya in Sirathu constituency …

     

     

    येथे पाचव्या टप्प्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या टप्प्यात 12 जिल्ह्यांतील 61 जागांवर मतदान होत आहे.

    संपूर्ण राज्याच्या नजरा कौशांबीच्या सर्वात हॉट सीट सिरथूकडे लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री मौर्य येथून निवडणूक रिंगणात आहेत. बसपाने येथून मुनसाब अली उस्मानी यांना उमेदवारी दिली आहे.
    तर दुसरीकडे आता शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याने ही निवडणुक चुरशीची होणार हे नक्की .

     

    कोण आहेत केशव प्रसाद मौर्य ?

    एकेकाळी सिरथूच्या गल्लीबोळात वृत्तपत्रे विकून आपल्या कुटुंबाला हातभार लावणारे .
    आज देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले केशव प्रसाद मौर्य . ज्यांच्या सहज आणि साध्या स्वभावामुळे ते पक्ष नेते आणि जनतेचे लाडके झाले आहेत.

    2022 च्या विधानसभा निवडणुकीत यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य कौशांबी जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सिरथू हे त्यांचे कामाचे ठिकाणच नाही तर ते एके काळी फूटपाथवर चहा विकण्याचे ठिकाण देखील आहे. केशव प्रसाद मौर्य यांच्या बालपणीची कहाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणाशी मिळतीजुळती आहे.

    वृत्तपत्र वाटून संघात प्रवेश

    केशव प्रसाद मौर्य जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगतात की, वृत्तपत्रे वाटताना ते संघाच्या शाखांमध्ये कसे जाऊ लागले आणि तिथून त्यांच्या नशिबाने कलाटणी घेतली.

    केशव सांगतात की, वृत्तपत्रे विकण्यासोबतच ते लहानपणापासून संघाच्या शाखांमध्ये जायला लागले.

    त्याचवेळी अशोक सिंघल यांनी त्यांना विश्व हिंदू परिषदेत काम करण्याची संधी दिली. सुमारे 20 वर्षे विश्व हिंदू परिषदेत काम करताना त्यांनी श्री रामजन्मभूमी आंदोलनातही सहभाग घेतला.
    केशव मौर्य यांनी 12 वर्षे कुटुंबाशी कोणताही संबंध ठेवला नाही कारण कुटुंबाला त्यांनी शाखेत जाणे पसंत नव्हते .

    योगी सरकारमध्ये केशव मौर्य उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. संपूर्ण राज्यात रस्त्यांचे जाळे टाकण्याचे काम या विभागाकडे होते.

    आता सर्व मुख्यालये चौपदरी रस्त्यांनी जोडली आहेत, ज्या तालुक्यांमध्ये पूर्वी खड्डे असायचे तेथे डांबरी आणि सिमेंटचे रस्ते करण्यात आले. राज्यात एकही दंगल झाली नाही. भाजप सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कशी आहे हे तेथील महिला सांगतात .याचा प्रत्यक्ष पुरावाही मतदानाच्या तीन टप्प्यांत दिसून आला असून त्यात निम्म्या लोकसंख्येने उत्साहात सहभाग घेतला आहे.

    सिरथू विधानसभेत चार लाख मतदार असून त्यात 1.50 लाख अनुसूचित जाती, 72000 मुस्लिम, 46000 पटेल, 30000 यादव आणि 16000 ब्राह्मण मतदार आहेत. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांची बहीण पल्लवी पटेल या सपाकडून केशव प्रसाद मौर्य यांच्या विरोधात रिंगणात आहेत.आता पल्लवी पटेल यांच्या भगिनी अनुप्रिया पटेल केशव प्रसाद मौर्य यांचा जोरदार प्रचार करत आहेत .

     

    UTTAR PRADESH: Jai Keshav Tay Keshav! Shiv Sena’s support to Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya in Sirathu constituency …

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य