- तुम्हाला राष्ट्रपतींकडून अपेक्षा नाहीत; तुम्ही हफीज सईद, झाकीर नाईककडूनच अपेक्षा करा
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कृषी कायद्यांवरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह राष्ट्रपतींवर अविश्वास दाखवायला गेले आणि नेटकऱ्यांकडून भरपूर ट्रोल झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उचकवण्यासाठी दिग्विजय सिंह यांनी ट्विट केले. त्यात ते राष्ट्रपतींवर अविश्वास दाखवून बसले. पण नेटकऱ्यांनी त्यांचा डाव ओळखला आणि त्यांना ट्रोल करण्याबरोबरच त्यांना पुरते उघडे पाडले.
कृषी कायद्यांविरोधातमोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यासमवेत पाच विरोधी पक्षांचे नेते यांनी ९ डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही या नेत्यांमध्ये होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे पाच नेते संध्याकाळी भेटले आणि त्यांच्याशी शेतकरी कायद्याबाबत चर्चा केली. या मुद्द्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक खोचक ट्विट केलं होतं. पण त्या ट्विटवरून तेच ट्रोल झाले. digvijay singh news
२४ राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटायला जाण्याआधी दिग्विजय सिंह यांनी एक ट्विट केले होते. “२४ राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ आज शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्याच्या मागणीबाबत राष्ट्रपतींना भेटायला जात आहे. परंतु मला राष्ट्रपतींकडून यासंदर्भात कोणतीही अपेक्षा नाही. मला वाटते की या २४ राजकीय पक्षांनी NDAतील घटक पक्षांशी चर्चा करायला हवी ज्यांना शेतकऱ्यांबद्दल आपुलकी असेल. नितीश कुमार यांनीही मोदी सरकारवर दबाव टाकायला हवा”, असे ट्विट त्यांनी केले होते.
त्यांच्या या ट्विटवर एका युजरने तडाखा लावत त्यांनाच ट्रोल केलं. “तुमच्यासारखे लोक असेच वागतात. ज्या देशात तुम्ही राहता, ज्या देशाचे मीठ खाता, त्या देशाच्या सरकार आणि राष्ट्रपतींकडून तुम्हाला काहीही अपेक्षा नसते. कारण तुमच्यासारख्यांना इस्लामिक दहशतवादी हाफिज सईद आणि झाकीर नाईक यांच्यासारख्यांकडून अपेक्षा असते.
digvijay singh news
तुमच्यासारख्या नेत्यांवर आम्ही थुंकतो. आम्हाला लाज वाटते की आताच्या काळातील जनतेने तुमच्यासारख्या लोकांना नेता म्हणून निवडले आहे”, अशा शब्दांत एका युजरने त्यांच्यावर टीका केली. नौटकी बंद करा, असे ट्विट करून दुसऱ्या युजरने त्यात राहुल गांधींचा फोटो वापरला आहे.