चीनचा विरोध झुगारून अमेरिकेने तिबेटबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांना पाठिंबा देत तिबेट निती आणि सहाय्यता अधिनियम विधेयक मंजूर केले आहे.
विशेष प्रतिनिधी
धर्मशाला : चीनचा विरोध झुगारून अमेरिकेने तिबेटबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांना पाठिंबा देत तिबेट निती आणि सहाय्यता अधिनियम विधेयक मंजूर केले आहे. US backs Dalai Lama over China’s opposition, approves Tibet policy
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी या विधेयकावर सही करून त्याला कायद्याचे रुप दिले. चीनने सुरूवातीपासून या कायद्याला विरोध केला होता कारण चीन तिबेटला आपलाच सार्वभौम भाग मानते. या विधेयकानुसार तिबेटमध्ये चीनी सरकारच्या कोणत्याही हस्तक्षेपास मज्जाव करण्यात आला असून अमेरिका तो मान्य करणार नाही. त्याची गंभीर परिणिीती होणार असल्याचे म्हटले आहे.
तिबेट पठारावरील पर्यावरण आणि जलसंसाधनांचे रक्षण करण्यासाठीची कलमेही या विधेयकात आहेत. त्याचबरोबर या विधेयकानुसार चीनी सरकारद्वारा तिबेटी नागरिकांचे इतरत्र कोठेही जबरदस्तीने पुनर्वसन करण्यास विरोध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तिबेट पठाराच्या पर्यावरण रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहयोगाचे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिकेचे सध्या चीनसोबत व्यापारी युध्द सुरू आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे चीन आणि अमेरिकेत पुन्हा एकदा राजनैतिक लढाई सुरू होणार आहे. त्याचबरोबर या विधेयकामुळे तिबेटच्या चीनी अधिपत्याखाली भागातही अमेरिकेच्या अधिकारी आणि नागरिकांना प्रवेश करता येणार आहे. तिबेटमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा याचा अधिकार आत्तापर्यंत चीनच्या अधिकाऱ्यांचा होता.
US backs Dalai Lama over China’s opposition, approves Tibet policy
प्रसिध्द लेखक ब्रम्हा चेलीनी यांनी याबाबत ट्विटरवर म्हटले आहे की अमेरिकेने तिबेटबाबतच्या धोरणाला कायद्याचे रुप दिले आहे. दलाई लामा यांना विरोध करणाऱ्या चीनी अधिकाऱ्यांना यामुळे मज्जाव घालण्याचा मार्ग मोकळा झाला. तिबेटवर चीनी पंजा पडून त्यांनी ताबा घेण्याचा शि जिनपिंग यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतानेही साथ द्यायला हवी.