- संघ लोकसेवा आयोग(UPSC)ने 2021-2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोग(UPSC)ने 2021-2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे. आयोगाच्या परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवू इच्छिनारे उमेदरवार upsc.gov.in या संकेतस्थळावर येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बघू शकतात.UPSC Exam Calendar | A golden opportunity to become a Class One officer; Schedule of examinations issued by UPSC; Here’s how to schedule …
युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी कॅलेंडरच्यामते युपीएससी नागरी सेवा परीक्षेची सूचना फेब्रुवारी 2022 मध्ये जारी करण्यात येईल. परीक्षा 5 जून रोजी आयोजीत करण्यात येईल.
तसेच नागरी सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा 16 सप्टेंबर 2022 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्याशिवाय 2021-22 मध्ये होणाऱ्या अन्य परीक्षांच्या तारखांबाबत सविस्तर माहिती अधिकृतसंकेतस्थळावर पाहता येईल.
युपीएससीचे 2021-2022 चे वार्षिक कॅलेंडर कसे डाऊनलोड करावे
सर्वात पहिले अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अधिकृत वेबसाईटवर जाऊन एग्जामिनेशन लिंकवर क्लिक करावे
नवीन पेजवर वार्षिक कॅलेंडर दिसेल
या कॅलेंडरची प्रत डाऊनलोड करा