- यूपीएससी ‘असिस्टंट कमांडंट’पदाच्या परीक्षेत मिरा रोड येथील भावना यादव देशात मुलींमध्ये पहिली आली आहे.
- महाराष्ट्रातील ती एकमेव उत्तीर्ण विद्यार्थिनी आहे.
- ती या परीक्षेत देशातून चौदावी आली आहे. तर मुलींमधून प्रथम येण्याचा बहुमान तिने पटकवला आहे
- लवकरच पुढील प्रशिक्षणासाठी ती हैदराबादला जाणार आहे.
- मिरा रोड येथील भावना मूळची सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीची.UPSC Assistant Commandant :Bhawna Yadav raises Maharashtra’s name across the country! Fadnavis’s phone says proud of you
विशेष प्रतिनिधी
मुंबई:केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या ‘असिस्टंट कमांडंट’पदाच्या परीक्षेचा (UPSC Assistant Commandant Exam) निकाल नुकताच जाहीर झाला. यात मिरा रोडच्या भावना यादव या २८ वर्षीय तरुणीने देशात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. भावनाने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केल्याने तिचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.देवेंद्र फडणवीस यांनी भावनाला फोन करत अभिनंदन केले .याविषयी लिहीताना फडणवीस म्हणाले आम्हाला तुमचा अभिमान..देशाचे नाव असेच पुढे न्या …UPSC Assistant Commandant :Bhawna Yadav raises Maharashtra’s name across the country! Fadnavis’s phone says proud of you
भावना मूळची सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील. तिचे वडील सुभाष यादव मुंबई पोलिस दलात सहायक फौजदार असून, सध्या ते बोरिवली येथील वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.
भावनाचे प्राथमिक शिक्षण अंधेरीच्या सेंट झेवियर्स शाळेत झाले. मागील काही वर्षांपूर्वी यादव कुटुंबीय मिरा रोडमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर भावनाने १०वीपर्यंतचे शिक्षण येथील शांतिपार्क येथील सेंट झेवियर्स शाळेतून पूर्ण केले. पुढे विरारच्या विवा कॉलेजमध्ये तिने एमएससीपर्यंत शिक्षण घेतले.
भावनाला लहानपणापासूनच केंद्रीय सेवेत जाण्याची इच्छा असल्याचे तिने २०१५पासून यूपीएससीची परीक्षा देण्यास सुरुवात केली. दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा ती दोन वेळा उत्तीर्ण झाली होती. मात्र मैदानी चाचणीत तिला अपयशाला सामोरे जावे लागले. भावना याआधीही केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची उत्तीर्ण झाली होती. मात्र त्यावेळीही तिला मैदानी परीक्षेत अपयश आले होते. यावेळी मात्र तिने बाजी मारली.
ही परीक्षा २०२० मध्ये घेण्यात आली होती. ४ जानेवारीला तिचा निकाल जाहीर झाला. परीक्षेत देशभरातील एकूण विद्यार्थी १८७ उत्तीर्ण झाले आहेत. यात भावना १४व्या क्रमांकावर आहे. ती देशात मुलींमध्ये पहिली आली असून, महाराष्ट्रातील ती एकमेव उत्तीर्ण विद्यार्थिनी आहे. लवकरच पुढील प्रशिक्षणासाठी ती हैदराबादला जाणार आहे.
वडिलांमुळे पोलीस दलाची आवड
भावनाचे वडील पोलीस दलात असल्यामुळे तीला देखील याच क्षेत्राची आवड होती. याच क्षेत्रामध्ये करीअर करण्याचा निश्चय तिने केला होता. त्यासाठी तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. मेहनत आणि जीद्दीच्या बळावर भावनाने हे यश मिळवले आहे. 2015 पासून ती युपीएससीची परीक्षा देत होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा ती दोन वेळा उत्तीर्ण देखील झाली होती. परंतु तीला मैदानी परीक्षेत अपयश आले. मात्र तिने खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर आज तिची केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठी निवड झाली असून, देशातून चौदावी येणाऱ्या बहुमान तिने पटकवला आहे.