• Download App
    उत्तर प्रदेशात डेंगीने हाहाःकार, अवघ्या तीन दिवसांत ४१ जणांचा मृत्यू UP shatters due to dengue

    उत्तर प्रदेशात डेंगीने हाहाकार, अवघ्या तीन दिवसांत ४१ जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – उत्तर प्रदेशमध्ये डेंगी तापाने सर्वसामान्य हवालादिल झाले आहेत. फिरोजाबादमध्ये गेल्या तीन दिवसांत ४१ जणांना मृत्यू डेंगीमुळे झाला आहे. मृतांमध्ये ३६ मुलांचा समावेश आहे. मथुरेत डेंगीमुळे १२ मुलांसह १४ जणांचा जीव गेला आहे. UP shatters due to dengue

    आजाराच्या फैलावामुळे मथुरेतील कोहा गावातील ५० पेक्षा अधिक कुटुंबे गाव सोडून गेले आहेत. गावात डेंगी, स्क्रब टायफस, मलेरिया व लेप्टोस्पायरोसिस या आजारांचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे.

    मुलांमध्ये डेंगीची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य अधिकारीही चिंतेत पडले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात दक्षतेचा इशारा दिला आहे.

    फिरोजाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंगीच्या तापाने ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. यात तब्बल ३६ मुलांचा समावेश आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी फिरोजाबाद जिल्ह्याच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना हटविण्याचा आदेश दिला.

    UP shatters due to dengue

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…