वृत्तसंस्था
मुंबई : अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास देण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. त्या द्वारे बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकलमधून होणारी घुसखोरी टाळण्यास मदत मिळणार आहे. त्याबाबतचे पत्र सरकारने रेल्वेला लिहिले आहे. Universal Travels Pass for Emergency Service Passengers for Local Travel; State Government’s Letter to Railways
सध्या मध्य रेल्वेतून १८ लाख जण प्रवास करत आहेत तर पश्चिम रेल्वेमधून ११ते १२ लाख जण प्रवास करत आहेत. यापैकी जवळपास पन्नास टक्के प्रवासी बनावट आयकार्ड बनवून रेल्वे तिकीट मिळवत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास घेणे आता बंधनकारक राहणार आहे.
पास कसा मिळवायचा ?
अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास मिळवण्यासाठी खालील साईटवर जाऊन आपला मोबाईल नंबरवरुन ओटीपी मिळवून विचारलेली माहिती भरायची आहे.
https://epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm
Universal Travels Pass for Emergency Service Passengers for Local Travel; State Government’s Letter to Railways
महत्त्वाच्या बातम्या
- किल्ले रायगड, माथेरानचे दरवाजे तब्बल तीन महिन्यांनी पर्यटकांना खुले ; ई -पासचे बंधन
- नळाने पाणीपुरवठ्यात चारपट वाढ , केंद्रातील मोदी सरकारचे यश; ११७ जिल्ह्यात ‘घर तेथे नळाने पाणी’
- उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार ; मायावतींची घोषणा ; एआयएमआयएमबरोबर आघाडी नाही
- नाशिकचे माजी शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचे निधन; शिक्षण क्षेत्राची मोठी हानी
- स्वदेशी ‘पिनाका’ रॉकेटची ओडिशात यशस्वी चाचणी, ४५ किलोमीटरवरचे लक्ष्य भेदले