वृत्तसंस्था
तिरअनंतपुरम : केरळात कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरु असताना राज्य सरकारला कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी विशेष अ धिवेशन बोलावण्याचे सुचतेच कसे, तुमचा विरोध गेला चुलीत. अगोदर कोरोना बळी रोखणार कसे, याचे प्रथम उत्तर द्या, असे केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना खडसावले. Union Minister V. Muralitharan’s harsh criticism
राज्य मंत्रिमंडळाने तीन कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन 23 आणि 31 डिसेंबर रोजी बोलवावे, असा तगादा राज्यपाल आरिफ खान यांच्याकडे शिफारस करून लावला होता. परंतु खान यांनी त्यांची पहिली शिफारस फेटाळली होती. त्यानंतर दुसरी शिफारस मंत्रिमंडळाने केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुरलीधरन बोलत होते. Union Minister V. Muralitharan’s harsh criticism
ते म्हणाले, देशाचा विचार करता राज्यात कोरोना बळीचे तांडव सुरु आहे. बळीचा आकडा राज्यात जास्त आहे. सरकारने यापूर्वी राज्यात कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना चांगल्या केल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली होती.
Union Minister V. Muralitharan’s harsh criticism
पण आता आकडेवारी पाहिली तर बळींची संख्या राज्यात अधिक असल्याचे स्पष्ट झाले. आतातरी सरकारने डोळे उघडावेत. प्रथम या गोष्टीकडे लक्ष द्यावे. कृषी कायदा , शेतकरी आंदोलन या पेक्षा हा मुद्दा सध्या तरी अधिक गंभीर आहे.