विशेष प्रतिनिधी
अमरावती : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा अमरावती दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपब्लिकन ऐक्य केव्हा होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. आठवले म्हणाले, लोक तर सगळे म्हणतात हाय हाय….Union Minister Ramdas Athavale criticizes Prakash Ambedkar
लोक तर सगळे म्हणतात हाय हाय….. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच काय… यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका करत मत खाण्याचं राजकारण होत असल्याचा आरोप केला. युती केल्याशिवाय सत्ता मिळणं कठीण आहे, असंही त्यांनी सुचवलं. मी कोणाच्याही नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे, रिपब्लिकन ऐक्य व्हावं, अशी इच्छाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. मात्र सध्या तरी हे अशक्य नाही, असेही आठवले म्हणाले.
Union Minister Ramdas Athavale criticizes Prakash Ambedkar
- केंद्रीय मंत्री आठवलेंना रिपब्लिकन ऐक्यावर प्रश्न
- प्रकाश आंबेडकरांवर आठवलेंची घणाघाती टीका
- मत खाण्याचं राजकारण सुरू आहे…
- युती केल्याशिवाय सत्तेत राहणं कठीण
- मी कोणाच्याही नेतृत्वात काम करायला तयार
- रिपब्लिकन ऐक्य व्हावं, आठवलेंची व्यक्त केली इच्छा