• Download App
    इतरांचे म्हणणें उमजून घ्या |Understand what others are saying

    लाईफ स्किल्स : इतरांचे म्हणणें उमजून घ्या

    इतरांचे म्हणणें आपल्याला समजून-उमजून ऐकून घेता येणे हे महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. व्यवस्थापक, राजकीय नेता, समाजसेवक, प्रशिक्षक, निवेदक, उदघोषक यांना जशी बोलण्याची कला अवगत असायला हवी तव्दतच ऐकण्याच्या कलेतही ते निपुण असायला हवेत. उत्तम वक्ता होण्यापेक्षा उत्तम श्रोता होणं जास्त कष्टसाध्य कला समजली जाते. खरं म्हणजे आपणा सर्वांनाच ऐकण्याची कला अवगत असायला हवी. लोकांसमवेत काम करतांना लक्ष्यपूर्वक ऐकणं या प्रक्रियेला खूप महत्त्व आहे. लक्ष्यपूर्वक ऐकणं हा एक महत्त्वाचा शिष्टाचार समजला जातो.Understand what others are saying

    यामुळे ज्या व्यक्ती सोबत अथवा समूहासोबत आपण संवाद साधतोय त्यांना नक्की काय म्हणायचं आहे. याची स्पष्ट कल्पना आपल्याला येते. यामुळे कमी वेळात दर्जेदार संवाद साधला जाऊन वेळही वाचवता येतो. उत्तम संवादामुळे सांगणाऱ्याचही समाधान होतं. आपल्या कामातलं यश आपण किती नि काय लक्ष्यपूर्वक ऐकलं आहे आणि त्यानुसार केलेली कृती यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं.

    केवळ ऐकू यायला ऐकणं म्हणता येत नाही. ऐकण्याची प्रक्रिया दोन पातळ्यांवर घडायला हवी. एक म्हणजे शब्दाची पातळी. बोलत असताना आपण खूपदा भावनिक पातळीवरून संवाद साधत असतो. परंतु ऐकतांना मात्र बऱ्याचदा भावनिक पातळी विसरली जाते. आपण ज्या व्यक्तीसोबत बोलत आहोत त्याचे केवळ शब्दच न ऐकता त्यामागच्या भावनाही ऐकता आल्या पाहिजेत.

    यासाठी आवश्यकता आहे ती स्वतःचं बोलणं ऐकण्याची, स्वतःच्या भावना ऐकण्याची, स्वतःच्या भावनांची जाणीव असण्याची, यामुळे इतरांच्या भावना संवेदनशिलतेनं ऐकता येतात. मुळात जर स्वतःशीच संवाद साधता येत नसेल तर दुसऱ्यांशी संवाद कसा साधता येईल? बोलणाऱ्यांच्या बोलण्यातला आशय आणि भावना दोन्ही समजून घेणं म्हणजे उत्तम ऐकणं, असं म्हटलं जातं.

    Understand what others are saying

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!