कोरोनानंतर अर्थचक्र हळू हळू सुरळीत होवू लागले आहे. पण आधीच्या काळात जो आर्थिक फटका बसला आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. अशा वेळी कमी कष्टात जास्त पैसे मिळवण्याचा मोह कोणालाही होवू शकतो. अडचणी शर्वांनाच असतात पण संपत्ती मिळवण्यासाठी कष्ट व कायदेशीर मार्गच उपयुकत ठरतात हे नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे असते. कोणत्याही भोंदू बाबाची सेवा तुम्हाला श्रीमंत बनवणार नाही. कोणतीही योजना एका महिन्यात दुप्पट परतावा देत नाही.Under no circumstances should you take the path of instant riches
उगाचच जास्त व्याज किंवा परतावा मिळतोय म्हणून आपल्या कष्टाचे पैसे गुंतवू नका. गुंतवणूक करताना किमान त्या गुंतवणुकीची प्राथमिक माहिती, सर्व कागदपत्र व दस्तावेजांची छाननी, कायदेशीर गोष्टी, नियम व अटी हे सर्व समजून घेऊन मगच गुंतवणूक करा. आवश्यकता वाटल्यास तज्ञांचा सल्ला घ्या. कोणाशीही आर्थिक व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या. ऑनलाईन व्यवहारांसंदर्भात बँकेकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सुचनांचे पालन करा.
कोणत्याही परिस्थितीत डेबिट, क्रेडिट कार्डचे डिटेल्स, त्यामागचा सीव्हीव्ही क्रमांक, ओटीपी, नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंग पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. गूगल पे, पेटीएम, फोनपे यासारखी ॲप वापरताना, कोड स्कॅन करताना योग्य ती काळजी घ्या. फसवे मेसेजेस आणि फोन कॉल्सपासून सावध रहा.
कोणतीही नामांकित कंपनी पैसे घेऊन नोकरी देत नाही. ज्यांचा करोडो रुपयांचा बिझनेस आहे ते तुमच्याकडे काही हजार किंवा लाख कशाला मागतील? आणि ते पण तुम्हालाच नोकरी द्यायला? जरा विचार करा. फसवणुकी पासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा हे सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जगातली कोणतीही व्यक्ती स्वतःचं नुकसान करून दुसऱ्याचा फायदा करून देत नाही. तेच लक्षात ठेवा. झटपट श्रीमंत करणारी कोणतीही योजना या पृथ्वीतलावर अस्तित्वात नाही.