• Download App
    Ukraine Russia Crisis : युक्रेनमध्ये अडकलेले 500 हून जास्त भारतीय मायदेशी परतले ! भारत माता की जय ! Thank You Indian Government Ukraine Russia Crisis: More than 200 Indians stranded in Ukraine return home! Glory to Mother India! Thank You Indian Government

    Ukraine Russia Crisis : युक्रेनमध्ये अडकलेले 500 हून जास्त भारतीय मायदेशी परतले ! भारत माता की जय ! Thank You Indian Government

     

    गेल्या अनेक आठवड्यांपासून युक्रेन आणि रशियामधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान,एक चांगली बातमी आहे. की युक्रेन मध्ये अडकलेले 242 भारतीय परतले आहेत .

    त्यांना रात्री एअर इंडियाच्या विमानाने आणण्यात आले. त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकत भारत सरकारचे आभार मानले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली विमानळ भारत माता की जय च्या जयघोषाने दणाणून गेले होते.युक्रेन-रशियामध्ये तणाव सुरु आहे. रशियाने युक्रेनवर हल्लाही केला आहे. अशात एक चांगली बातमी समोर आली आहे ती म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय त्यांच्या देशात परतले आहेत. यापैकी बहुतेक जण युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.Ukraine Russia Crisis: More than 500 Indians stranded in Ukraine return home! Glory to Mother India! Thank You Indian Government

     

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोट ऐकू येत आहेत. युक्रेनचे तिसरे मोठे शहर क्रेमटोर्स्क आणि ओडेसा येथे स्फोटाचा आवाज ऐकू येत आहेत.

    आणीबाणीची बातमी मिळताच मायदेशी परतले विद्यार्थी

    युक्रेनमधून भारतात परतलेल्या एका विद्यार्थ्याने दिल्ली विमानतळावर सांगितले की, ‘काल रात्री आम्हाला युक्रेनमध्ये 30 दिवसांच्या आपत्कालीन परिस्थितीची बातमी मिळाली आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो.

    ‘ तर एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, ‘मी जिथे राहत होतो, तिथे परिस्थिती ठीक आहे. कारण हे ठिकाण सीमेपासून खूप दूर आहे. पण आमच्या दूतावासाने आम्हाला मायदेशी परतण्यास सांगितले, अ‍ॅडव्हायझरी दिल्यानंतर मी परत आलो.’ युक्रेनमधून परतलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे फोटो समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना पाहून त्यांचे पालक भावूक झाल्याचे दिसले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

    युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक निवेदन जारी करून रशियाने हल्ला केल्याचे म्हटले आहे. ‘रशिया शांतताप्रिय युक्रेनच्या लोकांवर हल्ला करत आहे, ज्याला आम्ही उत्तर देऊ आणि आम्ही जिंकू’, असं त्यांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती खूपच तणावपूर्ण आहे. जगभरातील देशांकडून रशियाच्या या कृतीचा निषेध करण्यात येत आहे.

    महाराष्ट्र –

    महाराष्ट्रातील शेकडाे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेले आहेत. त्यातील १५ विद्यार्थी मुंबई विमानतळावर बुधवारी रात्री ११ वाजता सुखरूप परतले असून, त्यात लातूरची माेक्षदा कदमचाही समावेश आहे. यासाठी आम्हाला भारतीय दुतावासाची माेठी मदत झाल्याचेही माेक्षदाने सांगितले.

    लातूरमधील माेक्षदा या मुलीने युक्रेनमधील चर्नीव्हिन्सीमधील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश घेतला आहे. यंदाचे पाचवे वर्ष आहे. मात्र, सध्याला रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतीय विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत.

     

    महाराष्ट्रातील जवळपास दीड हजारांवर विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. आता ते विद्यार्थी युद्धाच्या पार्श्वभूमीवर मायदेशात परतण्यासाठी धडपड करत आहेत. अनेकांना विमानाचे तिकीट मिळत नसल्याची माहिती माेक्षदा कदमने दिली. बुधवारी रात्री मुंबईत दाखल झालेल्या विमानामध्ये महाराष्ट्रातील जवळपास १५ विद्यार्थी असल्याचे ती म्हणाली तर विमानातील निम्मे प्रवासी हे विद्यार्थी हाेते. युद्धाला ताेंड फुटल्याने भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी युक्रेनमधील भारतीय दुतावासाकडून वेळाेवेळी सूचना केल्या जात आहेत. भारतात परतण्यासाठी येत्या आठवड्यात दाेन विमाने आहेत.

    २७ फेब्रुवारी आणि ४ मार्चला ते भारताच्या दिशेने उड्डाण करतील.

     

    Ukraine Russia Crisis: More than 500 Indians stranded in Ukraine return home! Glory to Mother India! Thank You Indian Government

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका