• Download App
    उद्धव ठाकरे सभा : औरंगाबादच्या नामांतराला विमानतळाआडून बगल!!; तर राज्यसभेसाठी मतांवर डोळा ठेवून मनसे, एमआयएमवर टीकेच्या हलक्या चापटी!!|Uddhav Thackeray targets BJP, but reluctant to target AIMIM and MNS

    उद्धव ठाकरे सभा : औरंगाबादच्या नामांतराला विमानतळाआडून बगल!!; तर राज्यसभेसाठी मतांवर डोळा ठेवून मनसे, एमआयएमवर टीकेच्या हलक्या चापटी!!

    नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर च्या सभेत त्यांनी भरपूर राजकीय कसरत केली. मराठी माध्यमांनी त्यांच्या अजेंड्यानुसार उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठोक ठोक ठोकले वगैरे बातम्या दिल्या, पण त्यांच्या भाषणातले खरे राजकीय इंगित कोणी उलगडूनच दाखवले नाही!!Uddhav Thackeray targets BJP, but reluctant to target AIMIM and MNS

     एवढे भारी भाषण तर सरसंघचालकांच्या आधार का?

    उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार शरसंधान साधले, ही गोष्ट खरीच. पण त्यासाठी देखील त्यांना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भूमिकेचा आधार घ्यावा लागला या वस्तुस्थितीकडे मराठी माध्यमांनी दुर्लक्षित केले.



     टीकेच्या हलक्या चापट्या

    त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा आणि पुढे येणार्‍या विधान परिषद निवडणुकीवर डोळा ठेवून छोट्या पक्षांच्या आणि अपक्षांच्या मतांची गरज असल्यामुळे एमआयएम आणि राज ठाकरे यांची मनसे यांच्यावर देखील जपून टीका केल्याचे लक्षात आले. मध्ये कोणीतरी एकजण येऊन भोंगा वाजवून गेला आणि कोणीतरी येऊन थडग्यावर माथा टेकून गेला एवढेच उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले. मनसे आणि एमआयएम या पक्षांवर टीकेच्या तोफा डागणे सोडाच नुसत्या हलक्या चापट्या मारल्या.

    छएमआयएम, समाजवादी, मनसे मतांवर डोळा

    वास्तविक संभाजीनगर मध्ये एमआयएम हा पक्ष शिवसेनेचा कट्टर विरोधक आहे. एमआयएम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएम वर शरसंधान साधले असते ते तर ते स्वाभाविक ठरले असते. पण मुख्यमंत्र्यांनी तसे केले नाही. कारण 10 जून रोजी असलेल्या राज्यसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाची 2 मते महत्त्वाची आहेत. समाजवादी पक्षाची 2 मतेही महत्त्वाची आहेत. मग अशावेळी मुस्लीम पक्षांना टार्गेट करणे राजकीय दृष्ट्या परवडणारे नाही, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेऊन औरंगजेबाच्या थडग्यावर कुणीतरी येऊन डोके टेकून गेला एवढाच चापट मारणारा उल्लेख भाषणातून केला. तसेच मनसेला देखील अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला. कारण मनसेच्या एकमेव आमदाराचे मत शिवसेनेच्या उमेदवारासाठी महत्त्वाचे आहे.

    औरंगाबाद नामांतराचा बॉल केंद्राच्या कोर्टात

    भाजपला टार्गेट करणे त्यामानाने सोपे आणि स्वाभाविक आहे. काहीच दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढला होता, तो यशस्वीही झाला होता. त्यामुळे भाजपवर शरसंधान साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तो आयता मुद्दा मिळाला. पण त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा विषय मात्र चलाखीने विमानतळाच्या नामांतराकडे वळवून मूळ प्रश्‍नाला बगल देऊन टाकली. आधी विमानतळाचे नामांतर छत्रपती संभाजीराजे विमानतळ करा असे केंद्राचा सुनावून आपल्या कोर्टातला औरंगाबादच्या नामांतराचा बॉल केंद्राच्या कोर्टात ढकलून दिला.

    राजकीय कसरत माध्यमांना दिसली नाही

    मात्र, मराठी माध्यमांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या बातम्या देताना त्यांनी भाजपच्या प्रवक्त्यांना कसे ठोकले, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आणि प्रदेश पातळीवरच्या नेतृत्वाला कसे घेरले याचीच जोरदार रसभरीत वर्णने केली आहेत. पण उद्धव ठाकरे यांना राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत निमित्त करावी लागलेली राजकीय कसरत कोणाच्याही नजरेत भरली नाही आणि नजरेत भरली असली तरी माध्यमांच्याच विशिष्ट अजेंड्यांमुळे ती मांडता आली नाही!!

    Uddhav Thackeray targets BJP, but reluctant to target AIMIM and MNS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस