वृत्तसंस्था
सातारा : सातारचे क्रिडा संकुल अनुभव शून्य बांधकाम व्यावसायिकाला बांधायला का दिले, असा सवाल करून खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिमटे नाव न घेता काढले.
क्रिडा संकुल बांधण्यासाठी ज्या बांधकाम व्यवसायिकाची निवड करण्यात आली अशा माहिती नसलेल्या बांधकाम व्यावसायिकाला क्रिडा संकुल बांधण्याचे काम साताऱ्याचे तत्कालीन पालकमंत्र्यांकडून देण्यात आले होते. त्यामुळे सातारा क्रिडा संकुलाची अवस्था बिकट झाली आहे. या ठिकाणी कोणत्याही खेळाडूला आपले प्राविण्य दाखवता येत नाही. हे क्रीडा संकुल नसून ते व्यापारी संकुल म्हणून उभारण्याची संकल्पना साताऱ्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम व्यावसायिक राजेंद्र चोरगे यांची होती, असे त्यांचे नाव न घेता त्यांच्यावर साताऱ्यात आयोजित युवक परिसंवाद मेळाव्यात टीका केली आहे.
– उदयनराजेंचे पवारांना क्रीडा संकुलावरून चिमटे
– अनुभवशून्य माणसाला कसे काय काम दिले.
-साताऱ्यात युवक परिसंवाद मेळाव्यात टीका
– सातारच्या क्रिडा संकुलाची अवस्था बिकट