विशेष प्रतिनिधी
नाशिक : अपघातामुळे पुण्याकडे जाणार रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पंधरा दिवसांत दुसरी तर दोन महिन्यात अपघाताची चौथी घटना आहे.
मालवाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेस गाडीचे २डबे रुळावरून घसरले.
दुर्घटना मनमाडपासून २ किमी अंतरावर घडली असून गाडी पुणे येथून दानापूरकडे जात होती. मनमाड जवळ हा अपघात झाला.गाडीचा वेग कमी होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
- किसान एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले
- मनमाडजवळ दुर्घटना; रेल्वे वाहतूक विस्कळीत
- गाडी पुणे येथून दानापूरकडे जात होती
- गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली
- घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम सुरू