वृत्तसंस्था
कोलकाता – भाजपचे दोन खासदार बंगालमध्ये आमदार झाले; विधानसभेत जाण्यापूर्वीच राजीनामे दिले… ही बातमी आहे, भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार आणि नितीश प्रामाणिक यांची. या दोन्ही खासदारांनी भाजप नेतृत्वाच्या आदेशानुसार विधानसभेची निवडणूक लढवून जिंकली देखील पण त्यांना पक्ष नेतृत्वाने पुन्हा आदेश दिला, तो खासदार म्हणूनच संसदेत प्रतिनिधित्व करण्याचा. Two BJP MPs Jagannath Sarkar and Nisith Pramanik elected to the Bengal assembly from Santipur and Dinhata, respectively submitted their resignation before Speaker Biman Banerjee.
त्यामुळे जगन्नाथ सरकार आणि नितीश प्रामाणिक यांनी विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचे राजीनामे दिले. लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांना विधानसभेच्या निवडणूकीत उतरविण्याचा प्रयोग भाजपने फक्त जगन्नाथ सरकार आणि नितीश प्रामाणिक यांच्याच बाबतीत केला असे नाही, तर केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो, लॉकेट चटर्जी, स्वपन दासगुप्ता यांच्या बाबतीतही केला. पण या तीनही महत्त्वाच्या नेत्यांना विधानसभा निवडणूकीत अपयश आले.
यापैकी स्वपन दासगुप्ता यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नेमले होते. विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व सोडावे लागले होते. आता विधानसभेची निवडणूक लढवून हरल्यानंतर स्वपन दासगुप्ता हे आता कोणत्याच सभागृहातले लोकप्रतिनिधी उरलेले नाहीत. बाबूल सुप्रियो आणि लॉकेट चटर्जी मात्र लोकसभेचे सदस्य राहतील.
जगन्नाथ सरकार हे राणाघाट लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर नितीश प्रामाणिक हे कुचबिहार लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सरकार हे शांतिपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते, तर प्रामाणिक हे धीमांता विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. या दोन्ही मतदारसंघांमध्ये येत्या ६ महिन्यांच्या आत पोटनिवडणूक अपेक्षित आहे.
Two BJP MPs Jagannath Sarkar and Nisith Pramanik elected to the Bengal assembly from Santipur and Dinhata, respectively submitted their resignation before Speaker Biman Banerjee.
महत्त्वाच्या बातम्या
- देशात आणीबाणी लागू करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची याचिकेद्वारे मागणी, मद्रास हायकोर्टाने फेटाळली
- पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार, संशयित हल्लेखोराला अटक
- रुची सोयाकडून बाबा रामदेव यांच्या बिस्किट कंपनीची खरेदी, 60.02 कोटी रुपयांचा व्यवहार
- भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखांना दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने फेटाळली जामीन याचिका
- पंजाबमध्ये चाललंय काय? आधी रेमडेसिव्हिर नाल्यात फेकले, आता पीएम केअर्समधून मिळालेले व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून