• Download App
    सनसनी मागील सत्य: प्रयागराजमध्ये गंगेच्या काठी मृतदेह पुरण्याची परंपरा जुनीच ; इंटरनेट-मीडियामध्ये विनाकारण दुष्प्रचार;जागरण चा रिपोर्ट Truth  behind Sansani : The tradition of burying dead bodies on the banks of the Gangas in Prayagraj is old; Unwarranted propaganda in internet-media; Jagran's report

    सनसनी मागील सत्य : प्रयागराजमध्ये गंगेच्याकाठी मृतदेह पुरण्याची परंपरा जुनीच ; इंटरनेट-मीडियामध्ये विनाकारण दुष्प्रचार ; जागरण चा ग्राउंड रिपोर्ट

    • व्हायरल फोटो २०१८ मध्ये दैनिक जागरणच्या रिपोर्टरने काढलेला .Truth  behind Sansani : The tradition of burying dead bodies on the banks of the Gangas in Prayagraj is old; Unwarranted propaganda in internet-media; Jagran’s report

    • अनेक हिंदू कुटुंबांची परंपरा आहे की गंगा नदीच्या काठावर 
      तीर्थराज प्रयागमध्ये मृत व्यक्तिंना दफन केले जाते .याच जुन्या फोटोंना कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या मृतदेहांचे सांगून इंटरनेट मीडियावर खळबळ उडवली जात आहे.

    विशेष प्रतिनिधी

    प्रयागराज : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसर्‍या लाटेतील मृत्यूबद्दल इंटरनेट मीडियिवरून दिशाभूल केली जात आहे . त्यामुळे तीर्थनगरी प्रयागराजला नाहक बदनाम केले जात आहे. प्रयागराजमधील श्रृंगवेरपूर घाटात २०१८ मध्ये पुरलेल्या मृतदेहाची बहुतेक छायाचित्रे इंटरनेट मीडियावर व्हायरल झाली आहेत. याच फोटोंना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूशी जोडले गेले आहे. सत्य मात्र हे आहे की २०१८ मध्ये कोरोना नव्हताच.Truth  behind Sansani : The tradition of burying dead bodies on the banks of the Gangas in Prayagraj is old; Unwarranted propaganda in internet-media; Jagran’s report

    तीर्थराज प्रयागमध्ये अनेक हिंदू कुटुंबांची परंपरा आहे की गंगा नदीकाठी बारमाही मृतदेह दफण करण्यासाठी आणले जातात . दैनिक जागरणच्या रिपोर्टरने श्रृंगवेरपूर घाट येथे १८ मार्च २०१८ रोजी मृतदेह पुरल्याचे छायाचित्र काढले होते , जे तत्कालीन आहेत आणि त्यांना आताच्या परिस्थितीशी जोडले गेले आहे .

    २०१८ मध्ये जगातील कोणत्याही देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नाही. मग तो भारत आणि उत्तर प्रदेशात कसा होणार?मात्र  तीन वर्षांपूर्वीचे असेच एक चित्र इंटरनेट मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रयागराजमधील अनेक हिंदू कुटुंबांची मृतदेह  गंगेच्या काठी पुरण्याची पुरातन परंपरा आहे. उत्तर प्रदेश येथील फाफामऊ येथे देखील असे हजारो मृतदेह  दफन केले गेले आहेत

    पांढरे डाग, कुष्ठरोग, सर्पदंश यासह अकाली मृत्यू झालेल्यांचे मृतदेह येथे आणले जातात. आजकाल, अनेक वर्षे जुने मृतदेह येथे दफण केलेले  दर्शवून दिशाभूल केली जात आहे . या मृतदेहांच्या व्हायरल फोटोंद्वारे इंटरनेट मीडियावर खळबळ उडवली जात आहे.

    चित्रातील सनसनी मागील सत्य  पहा :

    संगमनगरी प्रयागराजमधील गंगेच्या बाजूला पुरलेल्या मृतदेहाचे वर्णन करताना ज्यांनी इंटरनेट माध्यमांवर गोंधळ घातला आहे त्यांनी काही जुनी छायाचित्रे काळजीपूर्वक पाहिली पाहिजेत. हे चित्र १८ मार्च २०१८ मधील आहे, जेव्हा तीर्थराज प्रयागचे कुंभ २०१९ च्या तयारीसाठी  पुनरुज्जीवन केले जात होते. हा  फोटो दैनिक जागरणचे फोटो पत्रकार मुकेश कनौजिया यांनी त्यांच्या कॅमेर्‍यावर टिपला होता.

    त्यावेळी कोरोनासारखी आपत्ती नव्हती किंवा मृतदेह पुरण्यासाठी कोणतीही सक्ती नव्हती. ही फक्त एक परंपरा होती जी पूर्वजांद्वारे येथे बर्‍याच हिंदू कुटुंबांमध्ये पाळली जात आहे. जी परंपरा खूप जुनी आहे, परंतु गंगा नदीच्या शुद्धतेसाठी योग्य नाही. प्रयागराजमध्ये श्रृंगवेरपूर आणि फाफामाऊ घाटात बर्याच काळापासून मृतदेह पुरण्याची परंपरा आहे. आताची परिस्थिती समजून घेण्यासाठी श्याम मिश्रा, पंकज तिवारी, अफझल अन्सारी आणि फोटो पत्रकार मुकेश यांच्यासह जागरण प्रयागराजचे संपादकीय प्रभारी राकेश पांडे श्रृंगवेरपूरसह गंगेच्या जवळपास असणार्या  डझनभर गावात ग्राउंड रिपोर्टसाठी फिरले.

    ७०किलोमीटरहून अधिक प्रवासात, पथकाने नवी घेऊन आलेल्या  वडीलधार्यांना या सर्व परंपरे बद्दल चर्चा केली .तसेच घाटावरील पांडा समाजा सोबत देखील  बातचीत करत सर्व प्रकार जाणून घेतला .

    येथील८५ वर्षीय पंडे राममूरत मिश्रा सांगतात की मी लहानपणापासूनच श्रृंगवेरपुरात मृतदेह जाळणे व पुरण्याची परंपरा  पहात आहे.

    सफेद दाग और सांप कटा तो दफनावै जात रहेन। छह-सात जिलन से संपन्न से लेकर गरीब परिवार तक भी शव लेकर आवत हैं। उनकेरे यहां दफनावै कै परंपरा बा।

    असेच म्हणने आहे ननकऊ पांडे यांचे. त्यांचे म्हणणे आहे की पूर्वजांच्या परंपरेनुसार कुष्ठरोगी आणि अकाली मृत्यु झालेल्यांचे मृतदेह जाळले जात नाहीत तर पुरले आहेत.

    कानपूरहून आलेला सुमारे पन्नास वर्षांचा पंकज म्हणतो की आमच्या काकांनी स्वत:च्या मृत्युनंतर दफण करण्यासाठी   स्वतःची जागा देखील  निश्चित केली आहे.  या व्यतिरिक्त बिहार, बाबूगंज, उमरी, पाटणा, मोहनगंज, सेरवान, शकरदाहा इत्यादी गावातील लोकांनीही मृतदेह दफन करण्याची परंपरा आहे.

    एकाच गावात ५० पैकी ३५ मृतदेह पुरण्यात आले :सरपंंच

    श्रृंगवेरपुरपासून अवघ्या तीन किमी अंतरावर मेंडारा हे गाव आहे. येथे १० एप्रिल ते १० मे दरम्यान सुमारे ५० जणांचा मृत्यू झाला. नवनिर्वाचित सरपंच महेश्वर कुमार सोनू म्हणतात की यातील सुमारे ३५ मृतदेह गंगेच्या काठावर परंपरेखाली पुरण्यात आले. मेलेल्यांपैकी काहीजण कर्करोगाने ग्रस्त होते तर काही दम्याने आणि हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. त्यापैकी बहुतेक  ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. होय, हे खरे आहे की यांची कोरोना तपासणी केली गेली नाही.

    परंपरेला ठेस पोहचणार नाही आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये यासाठी प्रयत्न: जिल्हाधिकारी

    प्रयागराज येथील जिल्हाधिकारी भानुचंद्र गोस्वामी यांनी सांगितले की, प्रयागराजमधील श्रृंगेरपूर आणि फाफमाऊ घाट येथे हिंदू कुटुंबात मृतदेह पुरण्याची परंपरा पुरातन आहे. आपल्याला परंपरेला नाकारू शकत नाही यासोबतच लोकांच्या धार्मिक भावना जोडलेल्या आहेत .

    मात्र  नदीच्या स्वच्छतेकडे देखील  दुर्लक्ष करता  येणार नाही. अशा परिस्थितीत मधला मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.लोकांना  पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली जात आहे, गरीब कुटुंबांना यासाठी आर्थिक मदतही देण्यात येत आहे.

    शैव धर्माच्या अनुयायांनी मृतदेह पुरले आहेत

    नियम बंदीनंतरही, शैव धर्माचे अनुयायी येथे मृतांना पुरत आहेत. घाटावर उपस्थित पंडित म्हणतात की शैव धर्माचे लोक गंगेच्या काठी मृतदेह पुरत आहेत. ही खूप जुनी परंपरा आहे. हे थांबवता येत नाही. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील.

    Truth  behind Sansani : The tradition of burying dead bodies on the banks of the Gangas in Prayagraj is old; Unwarranted propaganda in internet-media; Jagran’s report

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य