Sunday, 11 May 2025
  • Download App
    वाचनप्रेमी पर्यटकांसाठी खुशखबर! MTDC रिसॉर्ट्समध्ये लवकरच असणार वाचनालयाची सुविधाTourism Minister Mangal Prabhat Lodha Give The Order To Start The Library In MTDC Resorts..

    वाचनप्रेमी पर्यटकांसाठी खुशखबर! MTDC रिसॉर्ट्समध्ये लवकरच असणार वाचनालयाची सुविधा

    • पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रशासनाला सूचना..

    विशेष प्रतिनिधी 

    पुणे : वाचनप्रेमी पर्यटकांसाठी आता खुशखबर कारण सर्वसामान्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, वाढावी आणि ती जोपासल्या जावी याचबरोबर बाहेरून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला महाराष्ट्राची सर्व माहिती मिळावी यासाठी, आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्ट्समध्ये वाचनालये सुरू कऱण्यात येणार आहेत. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढील पंधरा दिवसांत यासंबंधीची कार्यवाही कऱण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. Tourism Minister Mangal Prabhat Lodha Give The Order To Start The Library In MTDC Resorts..

    या वाचनालयात ऐतिहासिक, महाराष्ट्रातील पर्यटनाविषयक, संत साहित्य, क्रांतिकार आदींच्या माहितीच्या पुस्तकांसह हिंदी, इंग्रजी, मराठी या भाषांमधील पुस्तके पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पर्यटनाबरोबरच आपला सांस्कृतिक वारसा आणि परंपरा जोपासणे आवश्यक आहे. या परंपरांची आणि वारशाची सविस्तर माहीती पर्यटकांना आणि नवीन पिढीला व्हावी, वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने वाचनालये सुरू कऱण्यात येत आहेत. तसेच, रिसॉर्टच्या ठिकाणी जागेची त्वरीत पाहणी करुन ग्रंथालये सुरु करावीत असेही सांगण्यात आले आहे.

    महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगर, महाबळेश्वर या ठिकाणी वाचनालये सुरु झाली आहेत. लवकरच लोणार, फर्दापुर या ठिकाणीही वाचनालय सुरु करण्यात येणार आहेत. वाचनाबरोबरच निसर्गाचा समतोल साधत पर्यटनाचा पुरेपुर आनंद घ्यावा, असे आवाहन एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

    Tourism Minister Mangal Prabhat Lodha Give The Order To Start The Library In MTDC Resorts..

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी