• Download App
    Torrential rain in Hingoli; The crisis of double sowing was averted

    हिंगोलीत मुसळधार पाऊस; दुबार पेरणीचे संकट टळले ; पिकांना जीवदान, बळीराजा सुखावला

    विशेष प्रतिनिधी

    हिंगोली : मागील १५ दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. Torrential rain in Hingoli; The crisis of double sowing was averted

    हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यामध्ये बुधवारी रात्री सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांना देखील जीवनदान मिळाले आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती व दुबार पेरणीचे संकट ओढावते की काय या चिंतेमध्ये शेतकरी पडले होते.

    परंतु हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून बुधवारी रात्री हिंगोली जिल्ह्यांमध्ये सर्वदूर पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यावरील दुबार पेरणीचे संकट टळले असून पिकांना देखील आता जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गातून आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    • हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस
    • दुबार पेरणीचे संकट टाळले
    • पावसाने मारली होती १५ दिवस दडी
    • हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला
    • पावसामुळे शेतकरी अत्यंत सुखावला
    • पिकांना पाऊस पोषक, जीवदान मिळाले

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…