- मोदी सरकारच्या बरोबरीने सोशल मीडियावर नेटकरी उतरले परकीयांच्या हस्तक्षेपाविरोधात
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले. पण गेले अनेक दिवस आंदोलन सुरू असताना खलिस्तानी प्रवृत्तींनी शेतकऱ्यांच्या नावाने डोके वर काढले. कॅनडा आणि ब्रिटनमधील खलिस्तानी समर्थकांनी यात राजकीय स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, केंद्र सरकारने तो हाणून पाडला. त्याला आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांची साथ मिळाली आहे. toronto will be khalistan netizens warns canadaian PM
टोरॅंटो बनेगा खलिस्तान असा हॅशटॅग ट्विटरवर तीन तासांपासून चांगलाच ट्रेंड होतो आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेपाचा प्रयत्न केला होता. त्यावेळी केंद्र सरकारने त्याला कणखर प्रत्युत्तर दिले होते. पण ट्रुडो यांच्या कारवाया थांबल्या नाहीत. त्यांनी आंदोलनाला पुन्हा पाठिंबा जाहीर केला. कॅनडातील खलिस्तानी प्रवृत्तींना एक प्रकारे हे खतपाणी घातले गेले.
या पार्श्वभूमीवर आज दुपारनंतर ट्विटरवर टोरँटो बनेगा खलिस्तान हा ट्रेंड चालू झाला. त्याला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. स्वतंत्र खलिस्तान राष्ट्र बनवायचेच असेल तर ते कॅनडाच्या भूमीवर बनवावे. भारतीय भूमीवर अजिबात आम्ही खलिस्तान बनवू देणार नाही, असा याचा राजकीय अर्थ आहे. आंदोनल भारतीय शेतकऱ्यांचे आहे.
toronto will be khalistan netizens warns canadaian PM
भारताचे सरकार याचा निर्णय करायला समर्थ आहे. कॅनडासारख्या देशांनी यात लक्ष घालायचे कारण नाही, हाच संदेश या ट्विटमधून एक प्रकारे देण्यात आला आहे. केंद्र सरकारने जस्टीन ट्रुडो यांना हा संदेश काही दिवसांपूर्वीच दिला होता. आज टोरँटो बनेगा खलिस्तान या ट्विटर ट्रेंडद्वारे नेटकऱ्यांनीही हाच संदेश कॅनडासह खलिस्तान समर्थकांना आणि परकीय शक्तींना दिला आहे.