• Download App
    top merit students also gave preference for ITI

    दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचीही यंदा आयटीआयला पसंती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेतलेल्या १०१ आणि ९० टक्केहून अधिक गुण घेतलेल्या तब्बल एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेशाला पसंती दिली आहे. Top merit students also gave preference for ITI

    आयटीआयमधील प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या गुणवत्ता यादीत गुणवत्तेने शंभरी गाठली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची आयटीआयच्या प्रवेशाकडे आपला कल दाखवल्याचे या गुणवत्ता यादीत दिसून आले आहे.

    राज्यात ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी आयटीआय असून, या सर्व आयटीआयमध्ये एकूण एक लाख ४८ हजार २९६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी १५ जुलैपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती.

    आलेल्या अर्जातील दोन लाख ५८ हजार ५६८ जणांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. यामध्ये ९० ते ९९ टक्के गुण घेतलेल्या तब्बल एक हजार विद्यार्थ्यांचा तर १०० टक्के गुण मिळवलेल्या १०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ८० ते ९० टक्केच्या दरम्यान दहावीत गुण मिळवलेल्या १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनीही आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला आहे. त्यांची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…