- भारतीय पॅराबॅडमिंटनपटू टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. नुकतंच भारताच्या प्रमोद भगत याने एक पदक भारताच्या खात्यात टाकलं आहे.
- मनोज सरकारने कांस्य पदक खिशात घातलं आहे.Tokyo Paralympics: Pramod Bhagat’s ‘Golden Point’ para badminton: India wins gold
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. आता भारताच्या प्रमोद भगतने स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. आधी सेमीफायनलच्या सामन्यात जपानच्या दायसुके फुजिहाराला नमवत प्रमोदने अंतिम सामन्यात धडक घेतली होती. अंतिम सामन्यातही धडाकेबाज कामगिरी करत प्रमोदने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथलला पराभूत केलं. या विजयासोबतच प्रमोदने भारताला स्पर्धेतील चौथं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.त्या बरोबरचं मनोज सरकारने कांस्य पदकाची कमाई केेली आहे .Tokyo Paralympics: Pramod Bhagat’s ‘Golden Point’ para badminton: India wins gold
असा झाला सामना
दोन्ही सेटमध्ये सरळ विजय मिळवत प्रमोदने सामना जिंकला. पहिला सेट 21-14 च्या फरकाने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये डॅनियलने पुनरागमन करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. पण शेवटच्या काही वेळात प्रमोदने उत्कृष्ट खेळ दाखवल सेट 21-17 च्या फरकाने जिंकत सुवर्णपदक खिशात घातलं.
भारताने बॅडमिंटनमध्ये (Badminton) आणखी दोन पदकं निश्चित केली आहेत. यामध्ये एक पदक हे भारताचे सुहास यथिराज (Suhas Yathiraj) यांनी सेमीफायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवल्यानंतर केलं आहे. त्यांनी पुरुषांच्या SL4 कॅटेगरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात इंडोनेशियाच्या खेळाडूला सरळ दोन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. यावेळी पहिला सेट 21-9 तर दुसरा सेट 21-15 ने सुहास यांनी जिंकला. सुहास यथिराज हे आता फायनलमध्ये पोहोचल्याने रौप्य पदकतर निश्चित झालं आहे. पण सुवर्णपदकाची आशाही कायम आहे. सुहास यांच्याच प्रमाणे पॅराबॅडमिंटनपटू कृष्णा नागरने पुरुष एकेरीच्या SH6 गटामध्ये सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनच्या क्रिस्टन कूंब्सला मात देत भारताच्या खात्यात आणखी एक पदक निश्चित केलं आहे.
मनोजला कांस्य –
मनोज सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला. मात्र तरीदेखील तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात त्याने पुनरागमन करत दमदार खेळ दाखवला. तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात त्याने विजय मिळवत कांस्य पदक जिकंलं आहे. त्याने जपानच्या दायसुके फुजिहाराला मात देत कांस्य पदक मिळवलं.
Tokyo Paralympics: Pramod Bhagat’s ‘Golden Point’ para badminton: India wins gold