• Download App
    Tokyo Paralympics : टोक्योत भारतीय कलेक्टरची कमाल, मेडल केले पक्के, जाणून घ्या कोण आहेत सुहास यथिराज! । Tokyo Paralympics Indian Collector in Tokyo Para Badminton finals, Know IAS Suhas Yathiraj Profile

    Tokyo Paralympics : टोकियोत भारतीय कलेक्टरची कमाल, मेडल पक्के; जाणून घ्या कोण आहेत सुहास यथिराज!

    IAS Suhas Yathiraj Profile : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 11 व्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली राहिली. बॅडमिंटन एसएल -4 मध्ये नोएडाचे कलेक्टर सुहास यथिराज यांनी अंतिम फेरी गाठून भारतासाठी पदक निश्चित केले आहे. सुहास यांनी पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल -4 स्पर्धेच्या गट सामन्यात आपले वर्चस्व कायम राखताना सहज विजय नोंदवला. टोकियो पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सुहास हे देशातील पहिले IAS अधिकारी आहेत. Tokyo Paralympics Indian Collector in Tokyo Para Badminton finals, Know IAS Suhas Yathiraj Profile


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 11 व्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली राहिली. बॅडमिंटन एसएल -4 मध्ये नोएडाचे कलेक्टर सुहास यथिराज यांनी अंतिम फेरी गाठून भारतासाठी पदक निश्चित केले आहे. सुहास यांनी पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल -4 स्पर्धेच्या गट सामन्यात आपले वर्चस्व कायम राखताना सहज विजय नोंदवला. टोकियो पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सुहास हे देशातील पहिले IAS अधिकारी आहेत.

    IAS सुहास यांचा संघर्ष

    आयएएस अधिकारी होण्यापासून ते पॅरालिम्पिक खेळांपर्यंतचा प्रवास सुहास यांच्यासाठी सोपा नव्हता. सुहास यांचा जन्म कर्नाटकातील शिगोमा येथे झाला. पायात अपंगत्व असूनही त्यांना लहानपणापासूनच खेळांमध्ये खूप रस होता. सुहास यांनी आपले प्राथमिक शिक्षण खेड्यात केले, तर सुरतकर शहरात असताना त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून संगणक विज्ञानातील अभियांत्रिकी पदवी पूर्ण केले. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर सुहास यांना बंगळुरूमध्ये एका कंपनीत नोकरी मिळाली.

    2007 मध्ये आयएएस

    सुहास यांनी बंगळुरूमध्ये नोकरी सुरू केली, पण कायम त्याच्या मनात खंत होती की त्यांनी आपल्या आयुष्यात समाजासाठी काही केले नाही तर आपला काहीच उपयोग नाही. त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. 2005 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर सुहास यांच्यावर मोठा मानसिक आघात झाला, पण तरीही त्यांनी स्वतःला सावरले आणि यूपीएससीची तयारी केली. 2007 मध्ये सुहास यूपी कॅडरमधून आयएएस अधिकारी झाले.

    ड्यूटीमधून वेळ काढून बॅडमिंटन खेळले

    यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते आग्रा येथे तैनात होते. आग्रा, जौनपूर, सोनभद्र, आझमगडनंतर ते हातरस, महाराजगंज, प्रयागराज आणि गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी झाले. ड्यूटी संपल्यानंतर सुहास वेळ काढून बॅडमिंटन खेळायला जायचे. हळूहळू ते व्यावसायिक बॅडमिंटन खेळू लागले. 2016 मध्ये सुहास यांनी आंतरराष्ट्रीय सामने खेळायला सुरुवात केली.

    2016 मध्ये रचला इतिहास

    बीजिंग येथे आशियाई पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये व्यावसायिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारे सुहास यथिराज हे पहिले भारतीय नोकरशहा ठरले. त्यावेळी ते आझमगडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून भारत आणि जगभर आपले नाव उंचावले.

    नोएडाचे डीएम

    सध्या सुहास हे नोएडाचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 2018 मध्ये वाराणसी येथे आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सुहास राष्ट्रीय विजेता ठरले.

    Tokyo Paralympics Indian Collector in Tokyo Para Badminton finals, Know IAS Suhas Yathiraj Profile

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य