वृत्तसंस्था
नवी दिल्ली: टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) भारतासाठी आजचा दिवस फारच उत्तम ठरला आहे. सकाळच्या सुमारास टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने रौप्य पदक जिंकल. Tokyo Paralympics 2020
तर दिवसखेरीस उंच उडी स्पर्धेत निशाद कुमारने भारतासाठी आणखी एक रौप्य पदक पटकावलं आहे. निशाद कुमारने पुरुषांच्या T47 गटात उंच उडी स्पर्धेत 2.06 मीटर उडी घेत पदक पटकावलं. यासोबतच त्याने आशिया खंडातील उंच उडी रेकॉर्डशी देखील बरोबरी केली आहे.
या स्पर्धेत अमेरिकेचा टाउनसेंड रोडेरिक याने 2.15 मीटरची उडी टाकत सुवर्ण पदक जिंकलं. विशेष म्हणजे त्याने एक नवं जागतिक रेकॉर्डही सेट केले. तर तिसऱ्या स्थानावर अमेरिकेचाच विसे डलास राहिला. त्याने 2.06 मीटर लांब उडी घेत कांस्य पदक पटकावलं