• Download App
    Tokyo Olympics : ४१ वर्षानंतर प्रथमच सेमीफाइनल: भारतीय हॉकी संघाचा विजय ; ग्रेट ब्रिटनला नमवले Tokyo Olympics: Semifinals for the first time in 41 years: Indian hockey team wins; Bowed to Great Britain

    Tokyo Olympics : ४१ वर्षानंतर प्रथमच सेमीफाइनल : भारतीय हॉकी संघाचा विजय ; ग्रेट ब्रिटनला नमवले

    • भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ओलिम्पिकमध्ये क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनला ३-१ ने नमवत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताकडून दिलप्रीत, गुरजंत आणि हार्दिक यांनी गोल केला.

    • ४१ वर्षानंतर भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला असून बेल्जियम संघासोबत भारताचा सामना असेल.

    • १९८० साली भारतीय संघाने म्युनिच (जर्मनी) येथे झालेल्या खेळांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करत आपलं शेवटचं पदक जिंकलं होतं.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ग्रेट ब्रिटेन वर ३-१ ने मात करत भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली पदकाची आशा कायम ठेवली आहे. Tokyo Olympics: Semifinals for the first time in 41 years: Indian hockey team wins; Bowed to Great Britain

     

    भारतीय संघाने सामन्यात आक्रमक सुरुवात केली. स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय आवश्यक होता. गोलकिपर पी.आर.श्रीजेश आणि बचावफळीने इंग्लंडचे सर्व हल्ले परतवून लावले.

    इंग्लंडचा बचाव भेदून पेनल्टी एरियात प्रवेश करत भारताच्या गुरजंत सिंहने आणखी एक गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. सुदैवाने मध्यांतरापर्यंत भारताने आपली २-० ची आघाडी कायम ठेवत इंग्लंडवर दडपण कायम ठेवलं.

    हार्दिक सिंगने निलकांत शर्माच्या सहाय्याने इंग्लंडचा बचाव भेदत ५७ व्या मिनीटाला गोल करत भारताची आघाडी ३-१ अशी आणखी मजबूत केली. यानंतर सामना संपायला अवघं दीड मिनीट शिल्लक असताना भारतीय खेळाडूंनी बॉल इंग्लंडच्या हाफमध्ये राहिल याची काळजी घेतली. सामना संपायला अखेरची ५० सेकंद बाकी असताना इंग्लंडला आणखी एक संधी मिळाली, परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. ३-१ च्या फरकाने भारताने सामन्यात बाजी मारत भारतीय हॉकीने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतासमोर बलाढ्य बेल्जिअमचं आव्हान असणार आहे.

    टोकियोत मनप्रीत सिंगच्या भारतीय संघाने आज इतिहासाची नोंद करत पुन्हा एकदा पदकाच्या आशा जागवल्या आहेत.

    Tokyo Olympics: Semifinals for the first time in 41 years: Indian hockey team wins; Bowed to Great Britain

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य