• Download App
    LUCKNOW:अयोध्येसह 46 रेल्वे स्थानकं उडवण्याची 'तोयबा'कडून धमकी; सुरक्षा व्यवस्था वाढवली Toiba threatens to blow up 46 railway stations including Ayodhya; Increased security

    LUCKNOW:अयोध्येसह 46 रेल्वे स्थानकं उडवण्याची ‘तोयबा’कडून धमकी; सुरक्षा व्यवस्था वाढवली

    • विधानसभा निवडणुकीमुळे देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातून मोठी माहिती समोर आली आहे. अयोध्येसह उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली असून, या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस्था वाढण्यात आली आहे.

    वृत्तसंस्था

    लखनऊ : राज्यासह देशभरात आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत आहे. देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह आहे. अनेक नागरीक दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्ताने आपापल्या घरी, नातेवाईकांकडे जात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारांमधील गर्दी वाढताना दिसत आहे. कोरोना संकट कुठेतरी ओसरताना दिसतंय. पण हे संकट मावळत असताना देशावर आणखी दुसरं संकट आणण्याचा दावा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोय्यबाने केलं आहे. या संघटनेने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र पाठवत देशातील 46 रेल्वे स्थानकं बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.Toiba threatens to blow up 46 railway stations including Ayodhya; Increased security

     

     

    रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवली

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पत्र हे रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालं आहे. लष्कर-ए-तोय्यबाच्या एरिया कमांडरच्या नावाने हे पत्र आलं आहे. या पत्राची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या पत्रात उत्तर प्रदेशातील लखनऊ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह एकूण 46 रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, श्वान पथक यांच्यासह गुप्तचर यंत्रणा कामाला लागली आहे.

     

    दिवाळी असल्यानं रेल्वे स्थानकांवरील गर्दी वाढली आहे. त्यामुळे अधिक काळजी रेल्वे प्रशासन आणमि पोलिसांकडून घेतली जात आहेत, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं

    Toiba threatens to blow up 46 railway stations including Ayodhya; Increased security

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य