सडपातळ होण्याकडे सध्या सर्वांचा कल आहे. त्याचे कारण म्हणजे बैठ्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाबासारखे अनेक विकार मागे लात आहेत. स्थूलता टाळण्यासाठी सर्वसाधारणपणे लोक कमी उष्मांक आणि जास्त ऊर्जा देणाऱ्या पदार्थांना प्राधान्य देतात. त्यामुळे शरीरात जादाची चरबी तयार होत नाही. त्यामुळे अनेक जण शाकाहाराचा अवलंब करतात. त्यात आता नव्याने वेगळी भर पडली आहे To lose weight, take a diet based on your blood type
ती म्हणजे रक्तगटानुसार आहार घेण्याची. आपण खाल्लेल्या अन्नाचा आपल्या रक्ताशी संबंध येतो. तुम्ही केवळ संतुलित आहार घेतल्याने शरीर संतुलित राहत नाही, त्यासाठी रक्तगटाला आवश्यतक असे अन्न घेणे गरजेचे असल्याचे मानले जाते. आपण आपल्या रक्तगटाला आवश्यठक असे अन्न खाल्यास त्याचे पचनही लवकर होते आणि यामुळे आपल्याला शरीरातील ऊर्जा वाढण्यास आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून शरीराचे रक्षण करण्यास मदत होते.
ओ रक्तगट असलेल्या लोकांनी प्रथिनयुक्त पदार्थ, कमी चरबीयुक्त आहार तसेच भाज्या, विशेषत: कडधान्ये, सोयाबीन आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे सेवन करावे. तर ए रक्तगट असलेल्यांनी जादा करून हिरव्या भाज्या, फळे, डाळी आणि धान्ये यांचा आहारात प्रामुख्याने सामवेश ठेवावा.
बी रक्तगट असल्लेल्यांनी भाज्यांसह दुग्धजन्य आहार जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा फायदा होतो. तर एबी रक्तगट असलेल्यांनी दुग्धजन्य पदार्थ आणि हिरव्या भाज्या जास्त सेवन कराव्यात. संशोधकांच्या मते रक्तगटानुसार काही पदार्थ कमी जास्त केले तर चांगल्या प्रकारे त्याचा फायदा झाल्याशिवाय रहात नाही.