वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हवालदिल झालेल्या करदात्यांना प्राप्तिकर खात्याने दिलासा दिला आहे. कर विवरणपत्र भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. To file income tax return Income Tax Department Given Extension Up to 30 September
आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यासाठी व्यक्तिगत करदात्यांना जुलै अखेर तारीख निश्चित केली होती. आता त्यात दोन महिन्यांचा कालावधी वाढवून दिला आहे. गुरुवारी सरकारने ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कंपन्यांना विवरण पत्र भरण्याची मुदतही ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एका महिन्याने वाढविली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा दाहक परिणाम पाहता, करदात्यांना दिलासा म्हणून हे मुदतवाढीचे पाऊल टाकल्याचे म्हटले आहे. पगारदार करदात्यांना विवरण पत्र भरण्यासाठी आवश्यक आणि नियोक्त्यांकडून दिले जाणाऱ्या ‘फॉर्म १६’ वितरित करण्याची अंतिम मुदतही १५ जुलै २०२१ अशी केली आहे.