वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईत चांगले रस्ते बांधणं हे काही रॉकेट सायन्स नाही. गेली २५ वर्ष शिवसेनेची सत्ता पालिकेत असून त्यांना हे का जमत नाही? असा सवाल मनसेचे नेते अमित ठाकरे केला आहे.To build good roads in Mumbai not reqired rocket science, Shiv Sena has been in power for 25 years but nothing has done : Amit Thackeray
मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली. अमित ठाकरे यांनी आज खराब रस्त्यामुळे कल्याण-डोंबिवली, असा प्रवास लोकलने केला. असा प्रवास करून त्यांनी खड्ड्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच परिस्थितीची जाणीव त्यांनी सत्ताधाऱ्यांना करून दिली आहे.
याबाबत अमित ठाकरे म्हणाले, राजसाहेबांकडे इच्छाशक्तीमुळे नाशिकमध्ये चांगले रस्ते बांधले गेले. तिथल्या रस्त्यावर एकही खड्डा नाही. मग गेली २५ वर्ष मुंबईची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना हे का जमत नाही? जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत तोपर्यंत आपले रस्ते सुधारणारच नाहीत, असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तसेच ठेकेदरांनी तुम्हाला न सांगता रस्ते बांधतात का? काम देताना ठेकेदारांकडे पाहिलं जात नाही का? फक्त कारवाई करू असे सांगितलं जातं. लोकांचे जीव जातायेत. एक वडील त्यांचा मुलगा खड्ड्यात पडून मृत्यू झाला म्हणून ते खड्डे बुजवत फिरतात. जोपर्यंत हे सत्तेत आहेत तोपर्यंत काही होणार नाही. रस्त्याने जाऊन वेळ घालवण्यापेक्षा लोकलनं प्रवास केला. नाशिकमध्ये रस्ते चांगले मग इतर ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था का? कारवाई करण्याचं नाटक केवळ लोकांना दाखवण्यापुरतंच आहे असंही अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली.
To build good roads in Mumbai not reqired rocket science, Shiv Sena has been in power for 25 years but nothing has done : Amit Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- अजून निर्णयच नाही, पण माध्यमांची आधीच घाई; टाटा समूहाला एअर इंडियासाठी करावी लागणार प्रतीक्षा, केंद्राने दिले ‘हे’ स्पष्टीकरण
- GST Collection : सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन १,१७,०१० कोटी रुपयांवर, वार्षिक आधारावर २३% वाढ
- ”मुलांना पार्ले-जी खाऊ घाला, नाहीतर अनर्थ होईल’, अफवेमुळे बिस्किटांचा अचानक वाढला खप, स्टॉकिस्टही झाले हैराण
- Navratri 2021 : मूर्ती विसर्जनावेळी फक्त पाच जणांना परवानगी, बीएमसीने नवरात्रोत्सवासाठी जारी केली नियमावली
- नाशिकमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ३.५ तीव्रता, केंद्रबिंदू जमिनीच्या ३ किमी आत