- आसनसोलचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश, पण राज्य सरकार लाभच घेऊ देत नाही
- आमदार जितेंद्र तिवारींचे नगरविकास मंत्र्यांना पत्र
विशेष प्रतिनिधी
आसनसोल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारशी असलेल्या मतभेदांचे रूपांतर राजकीय वैरात केल्याचा फटका विकासकामे आणि योजनांना बसतो आहे. हे म्हणणे भाजपचे नसून त्यांच्याच तृणमूळ काँग्रेसच्या आमदाराचे आहे. या आमदाराने थेट पत्र लिहून ही खंत व्यक्त केली आहे. TMC MLA Jitendra Tiwari takes a dig at mamata govt
आसनसोल पालिकेचे अध्यक्ष आणि तृणमूळ काँग्रेसचे आमदार जितेंद्र तिवारी यांनी राज्याचे नगरविकास मंत्री फिरहाद हकीम यांना पत्र लिहिले आहे. यात ते म्हणतात, आसनसोल पालिकेची निवड केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेत केली आहे. या योजनेतून शहरात अनेक विकास योजना येणे अपेक्षित आहे. त्याचा खर्च थेट केंद्र सरकारकडून पालिकेला येणार आहे. यात सार्वजनिक स्वच्छतागृहांपासून ते अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थांच्या विकासकामांचा समावेश आहे.
TMC MLA Jitendra Tiwari takes a dig at mamata govt
या योजना केंद्राने दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार अमलात आणल्या तर आसनसोल शहराचा चेहरा – मोहराच बदलून जाईल. लाखो नागरिकांना त्याचा लाभ होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल. परंतु, यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याची यासाठी आवश्यकता आहे. स्थानिक पातळी मनुष्यबळ, काही पायाभूत सुविधा देणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून त्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. परंतु, राजकारणामुळे तसे होताना दिसत नाही. या राजकारणाचा विकास योजनेत मोठा अडथळाच उत्पन्न झाला आहे. नगरविकासमंत्री म्हणून आपण आसनसोल पालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेला पाठिंबा द्यावा आणि त्यातील राजकीय अडथळे दूर करावेत, अशी विनंती तिवारींनी पत्राच्या अखेरीस केली आहे.