कोरोना नियमावलीचे उल्लंघन करून समुद्रावर फिरायला जाणे अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटनी यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Tiger Shroff, Disha Patni charged for violating the corona rules
प्रतिनिधी
मुंबई: कोरोना नियमावलीचे उल्लंघन करून समुद्रावर फिरायला जाणे अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटनी यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
१ जून पासून लॉकडाऊन चे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत, असे शासनाने जाहीर केले होते. परंतु लोकांच्या फिरणाऱ्यावर निर्बंध आहेत. मात्र, तरीही टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी, मुंबईतील बँड स्टॅन्ड येथील समुद्रकिनारी भटकण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत अजूनही काही मित्रमंडळी होती.
गस्तीवर असलेल्या वांद्रे पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी त्यांना हटकले व कोरोना काळात का बाहेर फिरताहेत असे विचारले. टायगर आणि दिशा समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळेच वांद्रे पोलीस ठाण्यात टायगर श्रॉफ, दिशा पाटणी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या विरोधात जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोविड-१९ विषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयपीसी कलम १८८ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे गुन्हे जामीनपात्र असल्यामुळे कोणालाही अटक झालेली नाही. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी असून गर्दी करण्यास मनाई आहे.
Tiger Shroff, Disha Patni charged for violating the corona rules
महत्त्वाच्या बातम्या
- Sputnik V Vaccine : सीरम इन्स्टिट्यूटने स्पुतनिक व्ही लस निर्मितीसाठी DCGI ला मागितली परवानगी
- सोशल मीडियावर तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती : युजर्सच्या सांगण्यावरून व्हॉट्सअॅप, फेसबुकला आक्षेपार्ह पोस्ट हटवावी लागणार; अशी करा तक्रार
- महाराष्ट्र सरकारची घोषणा, आपले गाव ‘कोरोना मुक्त’ करा आणि 50 लाखांचे बक्षीस मिळवा
- बुलडाण्यात आठ वर्षीय बालकाला कोरोना रुग्णांचे टॉयलेट स्वच्छ करायला लावले, व्हायरल झाला व्हिडिओ