भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार असून जानेवारी महिन्यात आणखी तीन नवीन राफेल विमाने ताफ्यात सामील होणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार असून जानेवारी महिन्यात आणखी तीन नवीन राफेल विमाने ताफ्यात सामील होणार आहेत. राफेलचा हा तिसरा ताफा भारतीय हवाई दलात सहभागी होणार आहे. सध्या भारतीय हवाई दलात लढाऊ विमानांची कमतरता ही राफेल विमाने भरून काढतील असा विश्वास हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. Three more rafel will join the airforce convoy
भारताने फ्रान्स मधल्या दासो कंपनीकडून फ्रेंच बनावटीची ३६ लढाऊ राफेल विमाने खरेदी करण्यासाठीचा करार आहे. त्यांची किंमत ५९ हजार कोटी रुपये आहे. त्यातील तीन राफेल विमाने फ्रान्सवरून जानेवारी महिन्यात येतील. जामनगर येथील विमानतळावर ही विमाने दाखल होणार आहेत. त्यामुळे भारतीय हवाई दलातील राफेल विमानांची संख्या ११ होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात फ्रॉन्सकडून तीन राफेल विमाने आली होती. त्याअगोदर पहिल्या तुकडीत पाच विमाने जुलै महिन्यात आली होती. या राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या मारक क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. रोफेल विमानांमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सेन्सर आहेत. चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखमध्ये हवाई दल हाय अलर्टवर आहे. राफेल विमानांमुळे त्यांच्या क्षमतेत वाढ होणार आहे. दर एक ते दोन महिन्यांच्या अंतराने किमान चार राफेल विमाने भारतीय हवाई दलात सामील होणार आहेत.
Three more rafel will join the airforce convoy
भारताला तब्बल २३ वर्षांनंतर परदेशी बनावटीची लढाऊ विमाने मिळणार आहेत. यापूर्वी रशियाकडून सुखोई-२० ही जेट विमाने १९९७ साली भारतीय हवाईल दलाला मिळणार होती. राफेलमधील ट्विन इंजिन जमीनीवरून तसेच समुद्रातही मारा करण्यास सक्षम आहे. या विमानांमध्ये दहा टन शस्त्रास्त्रे वाहनू नेता येऊ शकतात. भारतीय हवाई दलाच्या गरजेनुसार (इंडिया स्पेसिफिक) कोल्ड इंजिन तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये थंड प्रदेशातही वापर करण्याची क्षमता आहे.